Four Papers Of The International Board Are Pending Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

इंटरनॅशनल बोर्डचे चार पेपर प्रलंबित

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : इंटरनॅशनल सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन बोर्डच्या 10 वी परीक्षेचे चार पेपर अद्यापही झालेले नाहीत. हे पेपर कधी होणार, होणार की नाही, याबाबत विद्यार्थी आणि पालकांत अनिश्‍चिततेचे सावट आहे. जिल्ह्यातील 135 विद्यार्थी ही परीक्षा देत असून, त्यांच्यावर लॉकडाउनमुळे टांगती तलवारच लटकली आहे. 

कोरोनाचा दूरगामी परिणाम शिक्षण क्षेत्रावर झाला आहे. ऐन परीक्षेच्या हंगामात देशात लॉकडाउन सुरू झाले. त्यामुळे पेपर स्थगित करण्यात आले. यात दहावीचा भूगोल विषयाचा पेपर झाला नव्हता. तो शासनाने रद्द केला. जिल्ह्यात इंटरनॅशनल सर्टिफिकीट ऑफ सेकंडरी एज्युकेशन बोर्डची एकच शाळा आहे. सेव्हन डेज स्कूलमध्ये या बोर्डचे विद्यार्थी शिकतात.

या वर्षी 135 विद्यार्थी 10 वी परीक्षेला सामोरे जात आहेत. त्यांची परीक्षा 27 फेब्रुवारीला सुरू झाली. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शाळा बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे संगणक (23 मार्च), भूगोल (20 मार्च), हिंदी (26 मार्च), जीवशास्त्र (30 मार्च) हे पेपर स्थगित झाले. आता एक महिना उलटला तरी अद्याप आय.सी.एस.ई. बोर्डने या विषयांच्या परीक्षेचे काय करायचे, याचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांत अनिश्‍चितता आहे. ही परीक्षा एकूण 600 गुणांची आहे. परीक्षा न झालेल्या विषयांचे गुण पाहता 360 गुणांची परीक्षा अद्याप बाकी आहे.

ज्याप्रमाणे एस.एस.सी. बोर्डाने भूगोलचा पेपर रद्द केला. त्या धर्तीवर निर्णय होणार का? अशी शंका विद्यार्थ्यांमध्ये आहे. परीक्षा कधी हे माहिती नाही आणि असणाऱ्या सुटीचा आनंदही घेता येत नाही. अशी अवस्था विद्यर्थ्यांची झाली आहे. परीक्षा कधी होणार, याचा निर्णय स्थानिक पातळीवर नसून, तो दिल्लीतून होणार आहे. 

परीक्षा न झालेल्या विषयांचे गुण 
भूगोल- 80 
जीवशास्त्र- 80 
संगणक- 100 
हिंदी- 100 

मुलांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम
शैक्षणिक वर्षात 10 वीची परीक्षा अधिक महत्त्वाची असते. मुले वर्षभर अभ्यास करतात. परीक्षेसाठी त्यांची मानसिक तयारी झालेली असते. मात्र, अचानक पेपर पुढे गेल्याने मुलांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पेपर स्थगित करणे क्रमप्राप्तच होते. पण, आता हे पेपर कधी होणार, याची निश्‍चित माहिती लवकरात लवकर विद्यार्थ्यांपर्यंत पोचणे गरजेचे आहे. 
- सुनीता वांगीकर, पालक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 3.83? आठव्या वेतन आयोगाच्या बैठकीत विवाद! ..तर पगार किती वाढणार?

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT