four people are entries in kolhapur police in action mood 
कोल्हापूर

ते चौघे महाबळेश्वरमधून आले कोल्हापुरात अन् उडाला गोंधळ...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - महाबळेश्वरमधून आलेल्या चौघा जणांना लक्षतीर्थ वसाहतीतील शिवतेज काॅलनीत घेण्यास स्थानिक नागरिकांनी काल रात्री जोरदार विरोध केला. ते चौघे कंटेनरमधून आल्याने नागरिक व त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. पोलिसांनी तत्काळ या ठिकाणी धाव घेत त्या चौघांना ताब्यात घेतले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याचे समजते. या घटनेची नोंद घेण्याचे काम लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

कोरोनाचे सावट गडद होत असून परगावातून अथवा परजिल्ह्यातून आलेल्या लोकांकडे संशयाने पाहिले जात आहे. कंटेनरमधून आलेल्यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी ताजी असतानाच आज अन्य चौघे जण कंटेनरमधून लक्षतीर्थ वसाहतीत आले. त्याची माहिती स्थानिक नागरिकांना कळताच त्यांनी चौघांना कॉलनीत घेण्यास आक्षेप घेतला. त्यातून ते चौघे व नागरिक यांच्यात वादावादीचा प्रकार घडला. त्यातून तणाव वाढत गेला. ते चौघे कोरोनाबाधित नसतील कशावरून, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित झाला. त्यांची वैद्यकीय तपासणी केल्याखेरीज त्यांना कॉलनीत प्रवेश द्यायचा नाही, असा नागरिकांनी पवित्रा घेतला. त्यातून गोंधळ निर्माण झाला. याची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी तत्काळ त्याठिकाणी जाऊ जमावाला पांगवले. तसेच त्या चौघांना ताब्यात घेतले.याप्रकरणाची रात्री उशिरापर्यंत लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'T20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळाला, आता शुभमन गिल... ', पुजाराचे IPL 2026 साठी गुजरात टायटन्सबाबत मोठं भाकीत

Broiler Chicken : बॉयलर जिवंत कोंबड्यांना उच्चांकी दर; चिकनच्या दरात मोठी वाढ

Manchar News : कलमोडी प्रकल्पाच्या पाणी फेरनियोजनास राज्य शासनाची मान्यता; आंबेगाव व खेड तालुक्यातील ६,६२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

MSRTC : गारगोटी आगाराची १८ लाख कमाई; आदमापूर यात्रेसाठी सहा दिवसांत साडेपाचशे जादा फेऱ्या

Water Plant Negligence : अन्यथा कळंबा फिल्टर हाउसच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावू; नगरसेवकांचा इशारा, ‘बी वॉर्ड’ चे दुरवस्थेवर बोट

SCROLL FOR NEXT