four year child corona positive in kolhapur ichalkaranji
four year child corona positive in kolhapur ichalkaranji 
कोल्हापूर

ब्रेकिंग- आजोबापाठोपाठ चार वर्षाच्या नातवालाही कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : शहरातील कोले मळा परिसरातील एका 60 वर्षीय नागरिकाचा कोरूना पॉझिटिव आल्यानंतर त्याच्या चार वर्षाच्या नातवाचाही आज रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हाधिकारी दाैलत देसाई यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

काल कोरोनाबाधीताच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना कालच तपासणीसाठी शासनाच्या आयजीएम रुग्णालयात नेण्यात आले होते. त्याठिकाणी घरातील सर्वांचे स्वाब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. रात्री उशिरा हा त्यातील काही रिपोर्ट आले. यामध्ये एका 15 वर्षाच्या नातवाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे तर चार वर्षाच्या नातवाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कालच्या बाधित पत्नीचा व त्यांच्या घरातील अन्य दोघांचा अद्यापही रिपोर्ट येणार आहे.

दरम्यान, कोरोनाचा पुढील संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून 100 टक्के लॉक डाऊन पाळावा. यासाठी प्रशासनाच्य आवाहनानुसार 11 नियमांचे पालन करुन शहर कोरोनामुक्त होण्याचा संकल्प करुया, असे भावनिक आवाहन येथील पोलीस उप अधिक्षक गणेश बिरादार यांनी केले आहे. त्यांचे हे आवाहन सोशल मीडियातून आज दिवसभर व्हायरल झाले आहे.

राज्यातील एक दाट लोकवस्तीचे शहर असलेल्या  इचलकरंजीमध्ये कोरोना बाबत अतिशय जागृत राहण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत सर्वच  विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगली सेवा बजावली आहे आणि नागरिकांनीही चांगली साथ दिली आहे. महिनाभर प्रचंड मेहनत घेतली असतानाही दोन रुग्ण सापडल्यानंतर  बिरादार यांनी इचलकरंजीच्या नागरिकांना सजग राहण्यासाठी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

बिरादार यांनी सोशल मीडियाव्दारे मांडलेली भूमिका अशी, गेला महिनाभर इचलकरंजीत सर्वच घटकांनी चांगली मेहनत घेतली होती. त्यामुळे लॉक आऊट होण्याची वेळ असताना पून्हा लॉक डाऊन व्हावे लागत आहे. 95 टक्के नागरिक नियम पाळत आहेत. पण 5 टक्के नागरिकांनी गांभिर्याने न घेतल्यांने कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. चांगल्या बाबींकडे दुर्लक्ष करुन कांही नागरिक विनाकारण एकत्र येत आहेत. कोरोनांने आता वस्त्रनगरीत शिरकाव केला आहे. संपूर्ण शहर या विळख्यात जाण्यापूर्वी नागरिकांनी स्वतःवर कडक निर्बंध घालून घेण्याची वेळ आली आहे.  
इचलकरंजी शहराची संस्कृती, परंपरा, जडणघडण ही खूप महान आहे. येथील भरभराटीला इतिहास आहे. अदृश्य विषाणूमुळे वस्त्रोद्योगाची घरघर थांबली. आपण शिस्तबध्दपणे लढा देत आहोत. विजय समीप असताना शत्रू आपल्या गोटातील शिरकाव परतून लावण्याची वेळ आली आहे. त्यासाठी प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार 11 नियमांचे पालक करुया. यामुळे बेरजेने वाढ होईल पण गुणाकार होऊ द्यायचा नाही, असा विश्‍वास श्री. बिरादार यांनी व्यक्त केला आहे.

नागरिकांसाठी केलेले आवाहन

एकमेकांचा संपर्क टाळा, अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडा, मॉर्निंग व इव्हनिंग वॉक पूर्णपणे बंद करा, मुलांना गल्लीत खेळायला सोडू नका, एकमेकांच्या घरी जाणे टाळा, वृध्दांची काळजी घ्या, दुसर्‍या झोनमध्ये नाहक जाऊ नका, बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तीची माहिती आयजीएम रुग्णालय अथवा पोलिसांना द्या, वेळोवेळी हात धुवा, मास्क व सॅनिटायझरचा वापर करा.

“कोरोना वाढला तर कॉन्टेन्मेंट झोनमुळे शहरातील व्यवसाय सुरु होणार नाहीत. इचलकरंजी लवकरच सुस्थीतीत आणायची असेल तर जनता कर्फ्यू पुढील सहा दिवस कडक पाळावा.
-गणेश बिरादार, पोलीस उप अधिक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde: पंकजा मुंडेंना खासदार करा, अन्यथा मी... उदयनराजे बीडकरांना टोकाचं बोलले; दोन्ही नेत्यांच्या डोळ्यात अश्रू

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांनी घेतलं हनुमानाचं दर्शन

Viral Video: OYO हॉटेल्स बंद पाडणाऱ्या भाजप आमदाराच्या ऑफिसबाहेरच कपल्सचा रोमान्स? व्हिडिओ होतोय व्हायरल

Cryptocurrency: जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी भारतात येण्याच्या तयारीत; रिझर्व्ह बँक काय निर्णय घेणार?

25 years of Sarfarosh : आमिर खानला 25 वर्षानंतरही होतोय 'या' गोष्टीचा पश्चाताप; दिग्दर्शकाने केली पोलखोल

SCROLL FOR NEXT