four year old boy from Ichalkaranji became a corona free 
कोल्हापूर

दिलासादायक : इचलकरंजीतील 'तो' चार वर्षांचा बालक झाला कोरोना मुक्त....

सकाळवृत्तसेवा

इचलकरंजी - येथील कोले मळ्यातील चार वर्षाचा मुलगा आज कोरोनामुक्त झाला आहे. त्याचा दुसरा व तिसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याच्यावर येथील आयजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. आज त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. यामुळे इचलकरंजीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोले मळ्यातील 70 वर्षीय वृध्दाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याच्या चार वर्षाच्या नातवाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे वस्त्रनगरी हादरली होती. यातील वृध्दाचा 30 एप्रिल रोजी सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु असतांना मृत्यू झाला होता. तर त्याचा नातू असेलल्या चार वर्षीय मुलांवर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याचा दुसरा व तिसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे हा मुलगा आता कोरोनामुक्त झाला आहे. विशेष म्हणजे रुग्णालयात त्याच्या सेवेसाठी त्याची आई होती. आईचाही अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या मुलावर बालरोग तज्ञ डॉ.शोएब मोमीन, डॉ. संदीप मिरजकर उपचार करीत होते. आज दुपारी या मुलाला आता घरी सोडण्यात येणार असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajan Patil: अनगरच्या राजन मालकांनी शिवजयंतीची तारीखच बदलली; कौटुंबिक कारणामुळे परंपरा केली खंडित

Latest Marathi News Live Update : नाशिक महापालिका आयुक्तांच्या दालनात भाजप आमदार आक्रमक

आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीचा संसार मोडला! पदरात तीन मुलं; कौटुंबिक हिसाचाराचा आरोप, मागितले ५० कोटी

TCS Case Fine : TCS च्या अडचणीत मोठी वाढ! अमेरिकन अपील कोर्टानेही ठोठावला ₹1,738 कोटींचा दंड; नेमक प्रकरण काय आहे?

गर्भवती सुनेचे राक्षसी कृत्य! झोपेच्या गोळ्या देऊन सासूची हातोड्याने निर्दयी हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी रॉकेलने दिले पेटवून

SCROLL FOR NEXT