kolhapur Esakal
कोल्हापूर

Kolhapur: महापालिका गाडीच्या धडकेत 4 वर्षाची चिमुरडी जागीच ठार

संतप्त जमावाने महापालिकेच्या टेम्पोवर दगडफेक करून तोडफोड केली.

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : संभाजीनगर (Sambhaji Nagar येथे महानगरपालिकेच्या टेम्पो आणि मोटारसायकलच्या अपघातात चार वर्षाची बालिका ठार झाली. अन्वी विकास कांबळे (मूळ रा. वारे वसाहत, सध्या रा. रायगड कॉलनी) असे तिचे नाव आहे. अपघातात तिचे वडील ही जखमी झाले. संतप्त जमावाने टेम्पोवर दगडफेक केले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

याबाबत पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, विकास दिलीप कांबळे सध्या रायगड कॉलनी येथे राहतात. त्यांचे वारे वसाहत येथेही घर आहे. ते खासगी शिकवणी घेतात. आज सकाळी ते मुलगी अन्वी सोबत वारे वसाहत येथील घरी आले होते. बाराच्या सुमारास ते मोटरसायकलवरून अन्वीला घेऊन रायगड कॉलनीकडे जात होते. त्याचवेळी संभाजीनगर मार्गे रेसकोर्सच्या दिशेने महानगरपालिकेचा एक टेम्पो जात होता. त्या टेम्पोचा आणि कांबळे यांच्या मोटरसायकलचा गॅस एजन्सीच्या समोरील रस्त्यावर अपघात झाला. यामध्ये टेम्पो खाली मोटारसायकल जाऊन अन्वी गंभीर जखमी झाली तर कांबळे यांच्या हाता पायाला दुखापत झाली.

ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये (CPR) दाखल केले. पण उपचारापूर्वीच अन्वीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच संतप्त जमावाने महापालिकेच्या टेम्पोवर दगडफेक करून तोडफोड केली. तसा तणाव निर्माण झाला. घटनास्थळी जुना राजवाडा पोलिसांचे पथक दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली. त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. ती कांबळे कुटुंबाची एकुलती एक मुलगी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT