Fourth Victim Due To Corona In Gadhinglaj Taluka Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लज तालुक्‍यात चौथा बळी, शहरातील बाधितांची संख्या अकरावर

दिनकर पाटील

गडहिंग्लज : तालुक्‍यातील लिंगनूर कसबा नेसरी येथील एका 75 वर्षीय वृद्धेचा कोरानाने मृत्यू झाला. आता गडहिंग्लजमधील कोरोनाच्या बळींची संख्या चारवर पोहचली आहे. दरम्यान, या वृद्धेचा नातूही पॉझिटिव्ह आला असून त्याला खासगी संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. शिवाय गडहिंग्लज शहरातील भडगाव रोडवरील आयसीयूमधील एका वॉर्ड बॉयचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. तो येथील म. दुं. श्रेष्ठी विद्यालयात क्वारंटाईन होता. त्याला शेंद्री माळावरील कोवीड सेंटरमध्ये उपचारासाठी नेले आहे. त्याच्या कुटुंबातील सदस्यांचेही स्वॅब घेण्यात येणार आहेत. या रुग्णामुळे आता शहरातील बाधितांची संख्या 11 वर पोहचली आहे. 

गेल्या आठवड्यात मृत वृद्धेला कोरोनाची लक्षणे दिसत होती. त्यांना रविवारी (ता. 5) थेट कोल्हापुरातील डी. वाय. पाटील हॉस्पीटलमधील कोविड सेंटरमध्ये नेले होते. त्यांचा मंगळवारी (ता. 7) सायंकाळी मृत्यू झाला. कोल्हापुरातच अंत्यविधी झाले. स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या कुटूंबातील लोकांनाही क्वारंटाईन करून स्वॅब घेतले होते. त्यातील तिच्या चौदा वर्षीय नातवाचा अहवाल कालच (ता. 8) रात्री पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, ती कुठेही प्रवास केलेली नव्हती. त्यामुळे तिला लागण कशी झाली, याचा शोध आरोग्य विभाग घेत आहे. शेजारच्या बुगडीकट्टी गावात कोरोना रूग्ण होते. तालुक्‍यात यापूर्वी चन्नेकुप्पी, यमेहट्टी आणि हेब्बाळ जलद्याळ येथील प्रत्येकी एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. लिंगनूरच्या वृद्धेच्या मृत्यूने तालुक्‍यातील बळींची संख्या चारवर पोहचली आहे. तालुक्‍यातील बाधितांची संख्याही 115 वर पोहचली आहे. 

दरम्यान, गेल्या आठवड्यात शहरातील एकाच आयसीयूतील नऊ जण बाधित आढळले होते. त्यांच्या प्रथम संपर्कात आलेल्यांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. संबंधित वॉर्डबॉयचा अहवाल आज आला. संबंधित वॉर्डबॉय 41 वर्षीय असून तो स्थानिक आहे. राजेंद्र प्रसाद रोडवरील बाधित डॉक्‍टरांच्या प्रथम संपर्कात आलेल्या शहरातील बहुतांश जणांचे अहवाल प्राप्त झाले असून ते सर्व निगेटिव्ह आहेत. अजूनही 22 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. 

संपादन : सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasala Dam : खडकवासला धरणसाखळीत जूनमध्ये पावसाची शंभरी

मुंबईत संततधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने; अनेक भाग जलमय, ४ दिवस ऑरेंज अलर्ट

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

Latest Marathi News Live Update : पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT