fourty two new corona patients in Karnataka 
कोल्हापूर

गुजरातहून आलेले 'ते' 26 कोरोना पॉझिटिव्ह ; कर्नाटक राज्यात नवे 42 रुग्ण...

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - हासन जिल्ह्यात आढळलेल्या पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे कनेक्‍शन मुंबई असल्याची माहिती पुढे आली आहे. तर, यादगिरी, हासन आणि बागलकोट जिल्ह्यात 26 जणांना कोरोनाची लागण झाली असून, या रुग्णांनी गुजरात दौरा केल्याची माहिती पुढे आली. राज्यात 24 तासात नव्या 42 जणांना कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे निदान झाले आहे. त्यामध्ये हा विषय उघडकीस आला आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नऊशेचा आकडा पार केला आहे. बाधितांची संख्या 904 वर पोचली आहे. त्यामध्ये मुंबई, गुजरातहून परतलेल्यांना कोरोना झाल्याचे निदान झाले आहे. दरम्यान, राज्यात नव्या 42 रुग्णांपैकी दोन लहान मुली आहेत. त्याचे अनुक्रमे वय 7, 4 आहे.

गुजरातहून परतलेल्या 26 जणांना कोरोना

आरोग्य विभागाने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची यादी आज (ता.12) जाहीर केली. त्यामध्ये 24 तासात 42 जणांना कोराना झाल्याचा उल्लेख आहे. त्यापैकी बळ्ळारी, चिक्कबळ्ळापूर, बागलकोट, यादगिरी, मंड्या, धारवाड, बंगळूर, बिदर आणि हासन जिल्ह्यातील रुग्णांची समावेश आहे. हासन जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचे कनेक्‍शन मुंबई आहे. अलिकडे परराज्यातून कर्नाटकात येणाऱ्यांना क्वारंटाईन केले जात आहे. त्यानुसार हासनला मुंबईहून आलेल्यांची वैद्यकीय तपासणी केली. तपासणी अहवाल आज उपलब्ध झाला. पाच जणांना कोरोना लागण झाली आहे. त्यांचे अनुक्रमे वय 36, 27, 7, 45, 4 आहे. तसेच बागलकोट, धारवाड व यादगिरी जिल्ह्यात गुजरातहून परतलेल्या 26 जणांना कोरोना लागण झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.

बालकांना कोरोनाची लागण

हासनला 2 अल्पवयीन मुलिंना कोरोना लागण झाल्याचे निदान झाले आहे. अनुक्रमे वय 7, 4 आहे. पालकांसोबत मुलांची फरफट सुरु आहे. लहान मुले आणि वयोवृध्द यांना कोरोनाबाधा लवकर होते. त्यासाठी आरोग्य विभाग या घटकांची विशेष काळजी घेण्याबाबत सातत्याने आवाहन करत आहे. पण, राज्यामध्ये वाढती संख्या चिंता वाढविणारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT