कोल्हापूर

चौकटी

CD

पोलिस यंत्रणा सज्ज, पण काही सतर्क ...
कोल्हापूर, ता.४ः मतमोजणीच्या सुरुवातीच्या दोन-चार तासांच्या टप्प्यात सर्व पोलिस यंत्रणा सज्ज होती. साधारण दुपारी साडेबारा-एकनंतर त्यामध्ये शिथिलता आली. मतमोजणी केंद्रातील पोलिस वगळता रस्त्यावरील पोलिसांनी मोबाईल हॅण्डसेट घेऊन राज्याचा, देशाचा निकाल पाहण्यात वेळ काढला. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, उपअधीक्षक अजित टिके आणि सुजितकुमार क्षीरसागर मतमोजणी केंद्रावर वारंवार लक्ष्य ठेवून होते.
...
मतमोजणी केंद्रात मोबाईलशिवाय
मतमोजणी केंद्रामध्ये मोबाइल हॅण्डसेट घेऊन जाण्यासाठी मनाई होती. त्यामुळे मोजणी केंद्रावर जाण्यापूर्वीच प्रवेशद्वाराजवळ हॅण्डसेट ठेवण्यासाठी खास व्यवस्था केली होती. त्यासाठी वेगळा कक्ष होता. येथे काहींनी त्यांचे हॅण्डसेट जमा केले होते. स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था होती. नेटके नियोजन तेथे दिसून आले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नियोजन काटेकोरपणे अमलात येईल, याची काळजी घेतली.
...
पोस्ट चौक सुनासुना...
रमणमळा येथील जनरल पोस्‍ट ऑफिस चौक सुनासुना राहिला. धान्य गोदामात मतमोजणी असताना याच चौकात कार्यकर्त्यांना रोखले जात होते. त्यामुळे येथेच मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण झाली होती. महावीर कॉलेजजवळूनच पुढे मतमोजणी केंद्राकडे जाण्यासाठी सर्वसामान्यांसाठी रस्ता बंद केला होता. त्यामुळे केंद्राबाहेर जल्लोष नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : IIT मुंबईच्या गेटबाहेर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; साहिल वाकोडे आत्महत्याप्रकरणी कार्यकर्ते आक्रमक, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरातील 'डीप डिप्रेशन'ची तीव्रता वाढली; महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ओडिशा-आंध्र प्रदेश किनारपट्टीवर काय स्थिती?

IND vs AUS, U19 ODI: कर्णधाराचं शतक, सेहवागची फटकेबाजी; द्रविडला विश्रांती अन् युवा भारताचा ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश

Akola Crime : हिवताप अधिकाऱ्यासह लिपिक एसीबीच्या ताब्यात; आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसरात लाचप्रकरणी कारवाई

Phulambri News : मराठा क्रांती मोर्चाचा तहसीलवर मोर्चा..! अमोल खुणे व अजय बारस्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT