fraud with people on marketing with rupees 1.75 crore in kolhapur 
कोल्हापूर

गुंतवणुकीच्या अमिषाने भामट्यांनी घातला पावणेदोन कोटींचा गंडा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून पावणेदोन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतील कंपनीच्या पाच जणांवर जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पांडुरंग बाळासाहेब पाटील (वय ३९, रा. सादळे, ता. करवीर) यांनी फिर्याद दिली. हा गुन्हा मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. 

समीर जोशी, सुरेश पवार, जैसन रॉड्रीक, प्रेम चौधरी, अभिजित दुधवडकर (सर्व रा. मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित समीर जोशी, सुरेश पवार, जैसन रॉड्रीक, प्रेम चौधरी, अभिजित दुधवडकर हे पाच जण मुंबईत राहतात. त्या पाच जणांनी ‘टेक प्रॉफिट’ नावाची कंपनी सुरू केली.

शेअर मार्केटींगमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देतो असे आमिष दाखवून त्यांनी गुंतवणूकदारांना आकर्षित केले. गुंतवणुकीसाठी एक ॲप्लिकेशनही उपलब्ध करून दिले. सुरवातीला पांडुरंग पाटील यांनी त्यांच्याकडे १८ लाखांची गुंतवणूक केली. त्यांना सुरवातीला चांगला परतावाही कंपनीने दिला.

ते पाहून इतर गुंतवणूकदारांनीही कंपनीत एकूण १ कोटी ७५ लाख १४ हजार ८६६ रुपयांची गुंतवणूक केली; पण या सर्वांना मुदत संपूणही परतावा अगर मुद्दल मिळाली नाही. हा प्रकार सप्टेंबर २०१९ ते २० ऑक्‍टोबर २०२० अखेर घडला अशी फिर्याद पाटील यांनी दिली. त्यानुसार संबंधित कंपनीच्या पाचही संशयितावर फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदार हितसंबध प्रतिबंधक कायदा १९९९ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Latest Marathi News Live Update : साकीनाक्यात हिट अँड रन; अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Aadul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; पैठण तालुक्यातील एकतुनी येथील घटना

नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

SCROLL FOR NEXT