Fraud of Rs 11 lakh kolhapur ujalaiwadi 
कोल्हापूर

शेअर मार्केटमधून जादा परतावा मिळवू देण्याच्या अमिषाने 11 लाखांची फसवणूक 

राजेश मोरे

कोल्हापूर - शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जादा परतावा मिळून देतो असे अमिष दाखवून 11 लाख 60 हजाराहून अधिकची फसवणूक केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी एकाला अटक केली. पुष्कराज शरदचंद्र सावंत (सध्या रा. मंगेशकर कॉलनी उचगाव, करवीर) असे त्या संशयिताचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, मोहन कृष्णाप्पा भंडारे हे क्रशर चौक, सानेगुरुजी वसाहत येथे राहतात. ते महावितरणमधून सेवानिवृत्त झालेत. त्यांच्या मित्रांनी त्यांना शेअर मार्केट गुंतवणुकीवर जादा परतावा मिळेल. आपण त्यात पैसे गुंतवुया असे सुचवले. संशयित पुष्पराज शरदचंद्र सावंत अशी गुंतवणूक करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याच्याशी भंडारे आणि त्यांचे मित्र चंद्रकांत कुलकर्णी, सुनील चव्हाण यांनी संपर्क साधला. पुष्कराजने त्यांना तुम्ही माझ्या बॅंक खात्यावर पैसे भरा, तुम्हाला बॅंकेपेक्षा अधिक परतावा मिळून देतो असे सांगून विश्‍वास संपादन केला. त्यानुसार भंडारे यांनी बॅंके खात्यावरील व रोख असे 2 लाख 1 हजार 500 रूपयांची गुंतवणूक केली. तसेच चंद्रकांत कुलकर्णी यांनी त्याला 4 लाख 29 हजार तर सुनील चव्हाण यांनी त्याला 5 लाख 30 हजार रूपये असे तिघांनी एकूण 11 लाख 60 हजार 500 रूपयांची गुंतवणूक केली. 

संशयित पुष्पराजने सुरवातीला काही महिने संबधित गुंतवणुकदारांच्या बॅंक खात्यावर डिव्हीडंड जमा केला. नंतर तो बंद झाला. याबाबत भंडारे, कुलकर्णी व चव्हाण यांनी त्याच्याकडे विचारणा केली. सुरवातीला त्याने उडवावीची उत्तरे दिली. डिव्हीडंडबाबत विचारणा केल्यावर त्याने पैसे शेअर मार्केटमध्ये व म्युचअल फंडात गुंतवलेले नाहीत. हे पैसे स्वतः वापरले आहेत. घर विकून पैसे परत देतो असे सांगून बॅंकेचे तीन महिने मुदतीचे धानादेश दिले. पण ठरल्याप्रमाणे त्याने पैसे परत केले नाहीत. आमची त्याने 16 एप्रिल ते 25 ऑक्‍टोबर 2017 या कालावधित फसवणूक केली अशी फिर्याद भंडारे यांनी दिली. त्यानुसार संशयित पुष्कराज सावंत याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. रात्री उशिरा त्याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. 

गुंतवणूक केलेल्या रक्कमे बद्दलच्या खोट्या पावत्या संशयित पुष्कराजने गुंतवणूकदारांना दिल्या असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली आहे. अशा पावत्या त्याने आणखी कोणाला दिल्या आहेत का? याचा पोलिस तपास करीत आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

Gangapur News : १ लाख रुपयांच्या हुंड्यासाठी आणि जामिनाच्या पैशांसाठी विवाहितेचा छळ; चिमुकलीचा ताबा घेत विवाहितेला घरातून हाकलले

Ausa News : ओमराजेंबाबत आदित्य ठाकरेंचा ‘सॉफ्ट कॉर्नर’? बंडखोरी केलेल्या खासदारावर थेट बोलणे टाळले; ‘यायला हवे होते’ एवढेच उत्तर

LPG Cylinder: 1 ऑक्टोबरपासून 'एलपीजी'बाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल; 'या' ग्राहकांना मिळणार नाही लाभ

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरेंचा शेतात लाइट लावून शेतकऱ्यांशी संवाद

SCROLL FOR NEXT