fraud with shroff in gujari kolhapur 30 gram gold theft his employee in kolhapur 
कोल्हापूर

कारागिरानेच घातला सराफाला गंडा ; तयार करायला दिलेले ३० तोळे सोने घेऊन फरार

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : दागिने तयार करण्यासाठी दिलेले तब्बल ३० तोळे चोख सोन घेऊन पश्‍चिम बंगालमधील कारागीर फरारी झाला. त्याच्याविरोधात जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा नोंद झाला. शंभू कार्तिक बेरा (वय ३२) असे संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती, श्‍वेता कुलदीप गायकवाड कुटुंबासोबत शिवाजी पेठेत राहतात. त्यांचे पती कुलदीप गायकवाड यांचे गुजरी मेन रोड येथे यशोदीप ज्वेलर्सचे दुकान आहे. त्या पतींना सराफ व्यवसायात मदत करतात. संशयित शंभू बेरा मूळचा मुक्कम प्रजाबर, पश्‍चिम बंगालचा आहे. गुजरीत तो सोन्याचे दागिने बनविण्याचे काम करतो. गेल्या दहा वर्षांपासून तो गायकवाड यांच्या सराफ दुकानात कारागिर म्हणून काम करतो. तो सध्या गंगावेश येथील फ्लॅटमध्ये कुटुंबासोबत राहतो.
संशयित शंभूला गायकवाड यांनी १० जानेवारीला दागिने तयार करण्यासाठी ३०० ग्रॅम चोख सोने दिले होते. या सोन्यातून १० गंटन, १० सोन्याचे टॉप्स्‌ बनविण्याची जबाबदारी दिली होती.

दोन दिवसांत तो दागिने तयार करून देणार होता; पण त्याचा दुसऱ्या दिवशीपासून फोन बंद झाला. त्यामुळे गायकवाड यांनी तो राहत असलेल्या गंगावेश येथील अपार्टमेंटमध्ये व तो काम करत असलेल्या पापाची तिकटी परिसरात शोध घेतला. तो कोठेच सापडला नाही. यानंतर गायकवाड यांनी त्याच्या ओळखीच्या व्यक्तींकडे चौकशी केली; पण त्याची व कुटुंबीयाची माहिती मिळाली नाही. त्यामुळे तो ३० तोळे चोख सोने घेऊन पसार झाल्याची फिर्याद श्‍वेता गायकवाड यांनी जुना राजवाडा पोलिसांत दिली. त्यानुसार संशयित शंभू बेरा याच्यावर १५ लाख रुपये किमतीच्या दागिन्यांचा अपहार केल्याचा गुन्हा नोंद केला. पोलिस त्याच्या मूळ पत्त्यासह स्वतंत्र पथकाद्वारे शोध घेत आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT