Free check up of heart patients at Savitribai Phule Hospital 
कोल्हापूर

सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये हृदयरुग्णांची मोफत तपासणी

डॅनिअल काळे

कोल्हापूर ः येथील महापालिकेच्या सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये आता हृदयरुग्णांचीही मोफत तपासणी होणार आहे. यासाठी डॉ. विधुर कर्णिक यांनी मान्यता दिली आहे. माजी नगरसेवक ईश्‍वर परमार यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याशी डॉ. कर्णिक यांची भेट घडवून आणून दिली. डॉ.कर्णिक मोफत येथे उपचार करणार आहे. याचा फायदा शहरातील गरजू रुग्णांना होणार आहे. 
कोल्हापूर महापालिकेच्या सावित्रीबाई फुले हॉस्पीटलमध्ये टप्याटप्याने अनेक सुविधा निर्माण होत आहेत. या रुग्णालयात महात्मा फुले आरोग्यदायी जीवन योजनाही सुरु झाली आहे. त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात रुग्णांना झाला आहे. कोव्हिड काळामध्ये नॉन कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्यात सावित्रीबाई फुले हॉस्पिटल आघाडीवर होते. अर्थोपेडिक शस्त्रक्रिया करण्यातही या रुग्णालयाचा पुन्हा नावलौकिक वाढत चालला आहे. राज्यशासनाच्या योजनेतून उपचार होत असल्याने आता अनेक रुग्णांना त्याचा फायदा होत आहे. तसेच महापालिकेचाही अर्थिक ताण कमी होत आहे. राज्यशासनाकडून पैसे मिळत असल्याने रुग्णालयात टप्याटप्याने इतर सुविधा केल्या जात आहेत. 
या रुग्णालयात हृदयरुग्णांची कोणतीही व्यवस्था नव्हती, माजी नगरसेवक ईश्‍वर परमार यांच्या निदर्शनास ही बाब आली. याबाबतीत त्यांनी डॉ. विधुर कर्णिक यांच्याशी चर्चा केली. कर्णिक यांनी उपचार करण्यास तयार असल्याचे सांगितल्या नंतर त्यांनी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, आरोग्याधिकारी डॉ.पोळ आणि सावित्रीबाई फुले हॉस्पीटलमधील डॉ. पावरा यांच्याशी संवाद घडवून आणला. प्रशासक डॉ. बलकवडे यांनीही मंजूरी दिल्याने आता डॉ. विधूर कणिंक रुग्णालयात हृदयरुग्णांवर उपचार करणार आहेत. 

-संपादन ः यशवंत केसरकर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

SCROLL FOR NEXT