Free national flag from house to house in Chimgaon Inspection by drone 
कोल्हापूर

चिमगांवमध्ये घरोघरी मोफत राष्ट्रध्वज : ड्रोनद्वारे होणार पाहणी

ग्रामपंचायतीतर्फे लाडू ही वाटप

प्रकाश तिराळे

मुरगूड - कागल तालुक्यातील चिमगांव ग्रामपंचायतीने स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करताना गावातील सर्व नागरीकांचा सामावून घेण्यासाठी कौतुकास्पद पाऊल उचलले आहेत.हर घर तिरंगा लावण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज लावण्यासाठी मोफत दिला आहे. त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतुद ग्रामपंचायत प्रशासनाने केली आहे. एवढेच नव्हे तर स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाचा गोडवा घरा घरात पोहचावा यासाठी प्रत्येक घरी दोन लाडूचे पाकीट १५ ऑगस्ट रोजी वितरीत केले जाणार आहे.

गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.रुपाली दिपक आंगज यांनी ३० लाख रुपये खर्चून सुसज्ज बांधलेल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मानाच्या ध्वजाचे ध्वजारोहण शहीद पत्नी पुजा भगतसिंग एकल यांना करण्याचा मान दिला आहे.गावातील ९ स्वातंत्र्य सैनिकांच्या २५ वारसांचा तसेच २२ माजी सैनिकांचा सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ व आंबा रोप देवून गौरवही ग्रामपंचायतीतर्फे केला जाणार आहे.प्राथमिक शाळेच्या आवारात कांही दानशूर व्यक्तींच्या मदतीतून वृक्षारोपणही या दिवशी केले जाणार आहे.अंगणवाडीतील सुमारे ११० बालकांना ड्रेस आणि खाऊ वाटप केले जाणार आहे.

दरम्यान चिमगांव ग्रामपंचायतीने पंचायत समितीमधून शासकीय दरात आलेले ध्वज खराब असल्याचे लक्षात येताच तातडीने ३३ रु.ला एक ध्वज विकत घेवून तो घरोघरी सन्मानाने वितरीत केला आहे.राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही.याची पुरेपूर काळजी देखील ग्रामपंचायत प्रशासनाने घेतली आहे. आज गावातील प्रत्येक घरावर मानाने ध्वज फडकवण्यात आला.ही बाब शासनाला समजताच या गावच्या ग्रामपंचायतीच्या कामाची दखल घेण्यासाठी ड्रोनच्या माध्यमातून गावची पाहणी केली जात आहे.यासाठी सरपंच रुपाली आंगज,उपसरपंच नामदेव मांगले व ग्रामसेवक बी.के.साठे,मारुती पुरीबुवा, अर्जुन एकल,अनिल आंगज,दशरथ कांबळे,पुजा आंगज,छाया आंगज,सुनिता मुसळे,सुनिता गुरव,छाया भोई,स्वप्नाली अवघडे व ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम लाभले.

कौतुक...

चिमगांव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.रुपाली एकल यांनी सर्व सदस्यांना व नागरीकांना स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यासाठी सामावून घेत उत्कृष्ट कार्यक्रमाचे नियोजन केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT