The fruit market in Belgaum was ordered to closed 
कोल्हापूर

म्हणून बेळगावातील फळ मार्केट 17 मे पर्यंत बंद ठेवण्याचा आला आदेश...

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - एपीएमसीप्रमाणे फळ मार्केटमध्येही गर्दी होत असल्यामुळे सर्व नियमांना हरताळ फासण्याचे काम व्यापाऱ्यांसह ग्राहकांकडून करण्यात येत आहे. परिणामी प्रशासनाने खबरादारी म्हणून गांधीनगर येथील फळ मार्केट 17 मे पर्यंत बंद केले . तर ज्यांना फळांची विक्री करायची आहे. त्यांनी घरपोच करावेत. पण, दुकाने खुली करू नये. असे आदेश व्यापाऱ्यांना सोमवारी (ता.2) देण्यात आले.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव सुरूच आहे. तर याला आटोक्‍यात आण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अथक परिश्रम सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोना विषाणूची लागन झालेल्या रुग्णाची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. याला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. शहराजी मुख्य बाजारपेठ म्हणून रविवारपेठेकडे पाहिले जाते. गेल्या आठवड्यापासून रविवारपेठ जिल्हा प्रशासनाने बंद ठेवली आहे. याठिकाणी लोकांकडून योग्य पध्दतीने नियमांचे पालन करण्यात येत नसल्यामुळे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. आता याचप्रमाणे आजपासून (ता.2) गांधीनगर येथील फळ मार्केटही बंद ठेवण्यात आले आहे. बेळगाव जिल्हा रेडझोन असल्यामुळे प्रशासनाने लॉकडाऊन अगदी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. आज सकाळी पोलिसांनी फळ मार्केटला भेट दिली. दरम्यान, येथील व्यापाऱ्यांना कोरोनाबाबत खबरदारी घेण्याच्या महत्वाच्या सुचना देण्यात आल्या. तर कोरोना बाबतच्या देण्यात आलेल्या सुचनाचे पालन याठिकाणी होत नसून सामाजिक अंतर ठेवण्याऱ्या नियमाला हारताळ पासण्यात आला आहे. त्यामुळे मार्केट पूर्णता बंद ठेवा. याठिकाणी कोणतीही गर्दी होणार नाही. मात्र, लोकांना फळांची गरज भासल्यास त्यांना घरपोच फळे देण्याचे नियोजन करा. पण, मार्केट खुले करू नका. जर मार्केटमधिल दुकाने सुरू केला. तर कारवाई करण्यात येईल. अशा सुचना पोलिस प्रशासनाकडून व्यापाऱ्यांना देण्यात आल्या.
 

लॉकडाऊन वाढविण्यात आले असून संध्या बेळगावमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्याचबरोबर फळ मार्केटमध्ये व्यापाऱ्यांकडून आणि ग्राहकांकडून नियमांचे पालन योग्य पध्दतीने करण्यात येत नाही. त्यामुळेच फळ मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर ग्राहकांना फळे घर पोच देण्यासाठी व्यापाऱ्यांना सवलत देण्यात आली आहे. 17 मे पर्यंत फळ मार्केट बंद ठेवण्याचे आदेश व्यापाऱ्यांना दिले आहेत.

नारायण बरमणी - सहाय्यक पोलिस आयुक्त मार्केट पोलिस ठाणे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Gold Investment: आज 50 हजारांचं सोनं घेतलं तर 10 वर्षांनी किती लाखांचं होईल? जाणून घ्या गणित

खंजिरीचे बोल! राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कथा आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका, तुम्ही ओळखलंत?

Grahana Yoga 2026 : ग्रहण योग आणि अमावस्येचा भयानक संयोग; कोणत्या राशींवर होणार वाईट परिणाम? सूर्य-केतूच्या युतीनं 'या' लोकांचं वाढू शकतं टेन्शन

Marathi News Live Updates : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर

SCROLL FOR NEXT