Fruits And Vegetables Are Cheaper Due To Import Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

आवकेमुळे फळभाज्या, पालेभाज्यांचे दर पुर्वपदावर

दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : गेले दोन महिने कडाडलेल्या फळभाज्या, पालेभाज्यांचे दर आवक वाढू लागल्यामुळे पुर्वपदावर आले आहेत. फळबाजारात संत्री, ऍपल बोरांची आवक वाढली आहे. जनावरांच्या बाजारात म्हैशींना चांगली मागणी असल्यामुळे दर वधारले आहेत. सोयाबिनचा दर स्थिर आहे. ऊस लावणीत लावण्यासाठी फळभाज्या, कांद्याच्या रोपांना मागणी वाढली आहे.

गेल्या आठवड्यात लगतच्या कर्नाटकातील भाजीपाल्याची आवक सुरु झाल्याने दर पुर्वतत झाल्याची माहिती भाजीपाला खरेदी विक्री संघाचे महादेव तराळ यांनी दिली. दहा किलोचा सरासरी भाव 250 ते 300 रुपयांवर उतरला आहे. पालेभाज्यांच्या शंभर पेंढीचा दर 500 रुपयांवर आला आहे. दहा किलोचे भाव असे ः टेमॅंटो 200, वांगी 300,ढब्बू 250,कोबी 160, मिरची 450,प्लॉंवर 200, कारली 300, बिन्स 400 पेप्सी काकडी-150,कोल्हापूरी काकडी 400,भेंडी 300 रुपये. 

सोयाबीनची दर गेल्या पंधरा दिवसापासून चार हजारच्या घरात दर असला तरी शेतकऱ्यांची अपेक्षा याहुन जास्त असल्याने आवकेत वाढ नाही. फळबाजारात नागपूर परिसरातील संत्री तर सोलापूर जिल्यातील अँपल बोरांची आवक वाढली आहे. संत्री 40 ते 60 रुपये किलो आहेत. सफरचंद 100 रुपये किलो आहेत. कांदा बटाट्याचे दर टिकून आहेत. कांदा 40 ते 70 तर बटाटा 30 ते 50 रुपये किलो आहे. कांदा, वांगी, टॅंमेटो यांच्या रोपांच्या पेंढीचा दर 20 ते 50 रुपये असल्याचे विक्रेते शंकर पाच्छापूरे यांनी सांगितले. जनावरांच्या बाजारात म्हैशींना मागणी वाढल्याने दर सरासरी 10 ते 15 टक्के वाढले आहेत. 

मासे, अंडी, चिकनला मागणी 
दिवाळी संपल्यापासून येथील मटण मार्केटमध्ये मासांहारी खवय्यांची गर्दी वाढल्याने दर तेजीत आहेत. चिकन 200 रुपये टिकून असल्याचे विक्रेते समीर किल्लेदार यांनी सांगितले. माश्‍यांना चांगली मागणी असून दर 250 ते 600 रुपयांपर्यंत असल्याचे विक्रेते आसिफ बोजगर यांनी सांगितले. अंड्याचा शेकडा दर 490 रुपये तर, ट्रे 150, डझन 65 रुपये असल्याचे विक्रेते अमिन नदाफ यांनी सांगितले. 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

SCROLL FOR NEXT