A fund to destroy many through fake certificates 
कोल्हापूर

बनावट प्रमाणपत्राद्वारे अनेकांना गंडवण्याचा फंडा

महादेव वाघमोडे

उजळाईवाडी (कोल्हापूर)  ः तहसीलदार व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बनावट सही आणि शिक्‍क्‍याद्वारे बिगर शेती आदेश काढून गंडा घालणाऱ्या गजानन रवींद्र पाटील (कणेरी ता. करवीर) यास गोकुळ शिरगाव पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याची पोलिस कोञ्ठडीत रवानगी केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी; कणेरीतील संशयित गजानन पाटील याने बेबीताई श्रीकांत मांडेकर (नेर्ली ता. करवीर) यांना जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीस असल्याची बतावणी करून त्यांच्या नेर्ली येथील मालकीच्या जमीन गट नंबर 623 क्षेत्र 0.37.89 पैकी 0.21.00 चौरस मीटर आकाराच्या जमिनीच्या एका गटाचे दोन बिगरशेती प्रमाणपत्र तयार करून त्यावर तहसील कार्यालयाचा बनावट शिक्का व तहसीलदारांची सही करून बिगर शेती प्रमाणपत्र दिले. मंडल अधिकारी दीपक पिंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित पाटीलविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले. गोकुळ शिरगावचे सपोनि निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक फौजदार मानसिंग राजपूत, बाजीराव पवार, प्रदीप जाधव, अरुण नागरगोजे, संतोष तेलंग, नितीन सावंत, संदीप सावंत यांनी संशयितास अटक केली.

संशयिताने भूधारकांना बनावट अकृषक बिगर शेती प्रमाणपत्रे घरीच तयार केले. संगणक, प्रिंटर, स्कॅनर व पेन ड्राईव्ह तसेच शिक्के तयार करणाऱ्या मशीनद्वारे बनावट कागदपत्रे तयार करून बिगर शेती प्रमाणपत्राद्वारे अनेकांना गंडा घातल्याचे निदर्शनास आले. संशयिताच्या घरातून बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी आवश्‍यक साहित्य व बनावट शिक्के कागदपत्रे असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तपास पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, मानसिंग रजपूत, बाजीराव पवार करीत आहेत. 

संशयित आरोपी गजानन पाटील याने अलीकडच्या काळात बनावट सही शिक्के व कागदपत्रांद्वारे अनेक बनावट बिगर शेती आदेश काढल्याचा संशय आहे. अलीकडील बिगर शेती परवानाधारक मिळकतधारकांनी संबंधित कार्यालयात कागदपत्रांची पडताळणी करावी. 
- सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक गोकुळ शिरगाव पोलिस

संपादन - रंगराव हिर्डेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: कोस्टल रोडचा दहिसर-विरारपर्यंत विस्तार होणार! मुंबईसह पर्यटकांना मोठा लाभ; काय आहे नियोजन?

AUS vs IND, T20I Series: टीम इंडियाच्या मार्गातील मोठा अडथळा झाला दूर; ऑस्ट्रेलियन संघातून धोकादायक फलंदाज बाहेर

Latest Marathi News Live Update : सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान

Shocking News : पती दारू पिऊन झोपी जायचा, दीर दूधात नशेचा पदार्थ मिसळून अत्याचार करायचा; सासरच्या छळाची पीडितेने सांगितली आपबीती

Nashik News : ८ महिन्यांपासून आमदारांचा निधी अडकला! ‘ई-समर्थ पोर्टल’च्या चाचणीमुळे विकासकामांवर 'ब्रेक', लोकप्रतिनिधींपुढे नवा पेच

SCROLL FOR NEXT