fund distribution is not correct in jilha parishad kolhapur the decision of government the distribution of fund demand by others 
कोल्हापूर

निधीच्या वाटपात फक्त काहीच गब्बरांना मलई ; शासन निर्णयानुसारच निधीचे वाटप व्हावे

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्हा परिषदेला १५ व्या वित्त आयोगाचा निधी मिळून तीन महिने होत आहेत; मात्र असमान निधी वाटपाच्या हालचालीनंतर उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने १२ कोटी पडून आहेत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निधी वाटपात अन्याय केल्याचे सांगत महाविकास आघाडीचे पदाधिकारीही निधी वाटपात अन्याय करत आहेत. दोन्हीही सत्तेत पदाधिकारी व काही गब्बर सदस्य वगळता कोणालाच समाधानकारक निधी मिळाला नाही. त्यामुळे एकमेकांकडे बोट दाखवण्यापेक्षा शासन निर्णयानुसारच निधी वाटप झाल्यास सर्वसामान्य सदस्यांचे समाधान होणार आहे किंबहुना हाच पर्याय सत्ताधाऱ्यांसमोर उपलब्ध आहे.

विकासाचे राजकारण अपेक्षित असताना ना भाजप सत्तेत असताना याला प्राधान्य दिले ना महाविकास आघाडीने. या दोन्ही सत्तेत केवळ पदाधिकाऱ्यांनीच निधी पळवल्याचे स्पष्ट आहे. जर पदाधिकारीच निधी नेणार असतील तर इतर सदस्यांनी करायचे काय, असा प्रश्‍न आहे. कोरोनामुळे वर्षभर निधी उपलब्ध नाही, तर १५ व्या वित्त आयोगातून जो निधी मिळाला आहे, तो वाटप करण्याचे सुत्र जमत नसल्याने हा निधी विकासकामांवर खर्च होण्यापेक्षा पडून आहे.

भाजप सत्तेत असताना निधी मिळाला नसल्याचे सांगत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधकांच्या तोंडाला पाने पुसली; मात्र तेव्हा निधी मिळत नव्हता म्हणून कोणी न्यायालयात गेले नाहीत. आता विरोधक जेव्हा न्यायालयात गेले आहेत तेव्हा मात्र सत्ताधाऱ्यांची चुळबूळ वाढली आहे. विरोधक न्यायालयात गेल्याने सत्ताधाऱ्यांनी नेलेल्या निधीची माहिती सदस्यांसह नेत्यांसमोर आली आहे. त्यामुळे आता पदाधिकारी जो तोडगा काढतील, तो मान्यच होईल, अशी सध्या तरी शक्‍यता दिसत नाही. या प्रक्रियेत नेत्यांचीही दिशाभूल करण्याचे काम पदाधिकारी, कारभारी करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे याप्रकरणी नेत्यांनीच लक्ष घालून निधी वाटपाचा तिढा सोडवणे आवश्‍यक आहे.

सदस्यांचा आग्रह 

निधी वाटपाचा फॉर्म्युला विरोधकांनी धुडकावला. २६ जून २०२० ला जो शासन निर्णय काढला आहे, त्यामध्ये निधी वाटपाचे सूत्र दिले आहे. त्यानुसार पदाधिकारी वगळता बहुतांश सदस्यांना चांगला निधी मिळणार आहे. याद्याही सोशल मीडियातून प्रसिद्ध केल्या जात आहेत. त्यामुळे शासन निर्णयानुसारच निधी वाटप व्हावे, असा आग्रह सदस्यांकडून होत आहे. याचा विचार आता आघाडीला करावा लागणार आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT