Funding Of Rs 10 Lakh Was Received For Gadhinglaj Sports Complex Kolhapur Marathi News
Funding Of Rs 10 Lakh Was Received For Gadhinglaj Sports Complex Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लज क्रीडा संकूलसाठी 10 लाखाचा निधी 

अजित माद्याळे

गडहिंग्लज : तालुका क्रीडा संकुलासाठी अनेक वर्षापूर्वी दहा लाखाचा निधी प्राप्त झाला असून आता 90 लाखाचा निधी तातडीने उपलब्ध करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणार आहे. यातून लवकरच पहिल्या टप्प्यातील एक कोटीचे काम मार्गी लावू, अशी ग्वाही आमदार राजेश पाटील यांनी दिली. 

प्रलंबित तालुका क्रीडा संकूल उभारणीच्या पार्श्‍वभूमीवर येथे क्रीडा संकूल समितीची बैठक झाली. समितीचे कार्याध्यक्ष तथा तहसीलदार दिनेश पारगे, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता संजय मांजरेकर, सदस्य तथा उपनगराध्यक्ष महेश उर्फ बंटी कोरी, क्रीडा समन्वयक अनिल पाटील, सचिव तथा क्रीडा मार्गदर्शक कोडावळे, सदस्य श्रीपती सावंत, सदस्य तथा मुख्याध्यापक सुरेश मगदूम यांच्यासह अभय देसाई, राजेश पाटील उपस्थित होते. 

आमदार पाटील म्हणाले, ""आर्किटेक्‍ट गुरव यांनी साडेपाच कोटींचा क्रीडा संकुलाचा उत्कृष्ठ आराखडा तयार केला आहे. येत्या दोन-चार महिन्यात पहिल्या टप्प्यातील कामासाठी एक कोटीचा निधी शासनाकडून उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. याच कालावधीत कामाचा प्रारंभही करण्यात येईल. जमीन सपाटीकरणबरोबर चारशे मीटरचा ट्रॅकही तयार होईल. जेणेकरून खेळाडूंसाठी संकुलाचा वापर सुरू होणार आहे. येत्या चार वर्षात सर्व निधी आणून संकुलाचा संपूर्ण आराखडा अंमलात आणणार आहे.'' 

उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी क्रीडा संकूल उभारणीसाठी पालिकेतर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यासह शासन पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी मदत करण्याचे अश्‍वासित केले. 

"सकाळ'चा पाठपुरावा 
दहा लाखाचा निधी प्राप्त होवूनही अनेक वर्षापासून क्रीडा संकुलाचे काम रेंगाळले आहे. खेळाडूंच्या सोयीसाठी हे संकूल पूर्ण व्हावे म्हणून "सकाळ'ने वारंवार पाठपुरावा केला. आठवड्यापूर्वीच बातमीद्वारे या प्रश्‍नाकडे "सकाळ'ने लक्ष वेधले होते. त्याची दखल घेवून क्रीडा संकूल समितीने बैठक घेत पाठपुराव्याची ग्वाही दिली आहे. 

कसे असेल संकूल... 
- साडेपाच कोटीचा आराखडा 
- जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन व योगा हॉल 
- 400 मीटरचा ट्रॅक, 25 मीटर स्विमिंग टॅंक 
- कबड्डी, हॉलीबॉल, खो-खो, फुटबॉल, हॉकी मैदान 
- खेळाडू व स्टाफला राहण्याची सोय, 10 कमर्शियल शॉप 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT