Funeral performed on a corona positive person in kheradi vangi kadegav 
कोल्हापूर

धक्कादायक! कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीवर केले अंत्यसंस्कार, पण नातेवाईकांना माहितच नव्हते की त्यांना कोरोना झालाय ; सांगली जिल्हातील प्रकार...

संतोष कणसे

कडेगाव (सांगली) - खेराडे वांगी (ता. कडेगाव) येथे एका पस्तीस वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.तर संबंधित मयत व्यक्ती ही कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे काल बुधवारी (ता.22) माहिती मिळाल्यानंतर खेराडे वांगी गावातील 30 जणाना संस्थात्मक क्वारंन्टाईन केले असून त्यांना कडेगाव येथे शासकीय वसतिगृहात विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून सर्वांचे आज स्वॅब घेण्यात आले.

खेराडे वांगी गावातील एकजण मुंबई येथील एका हॉस्पिटल मध्ये ह्रदयाच्या उपचारासाठी 17 एप्रिल रोजी दाखल झाले होते.तर 18 एप्रिल राजी त्यांचे निधन झाले.त्यानंतर संबंधितांच्या पत्नींने त्याचदिवशी अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांचा मृतदेह मुंबईहून रुग्ण वाहिकेतून खेराडे-वांगी येथे आणला व नातेवाईकांनी येथे मृतदेहावर 19 एप्रिलला अंत्यसंस्कार केले.

प्रशासन खडबडून जागे

परंतु काल बुधवारी (ता.22) दुपारी संबंधिताच्या पत्नीने मुंबईतील संबंधित हॉस्पिटलमध्ये फोन करुन विचारले असता सदर मयत पतीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला असल्याचे त्यांना समजले.त्यानंतर त्यांनी याबाबत येथील तालुका प्रशासनास सांगितले. त्यानंतर तालुका प्रशासन व आरोग्य विभाग खडबडून जागा झाला तर खेराडे वांगीसह तालुक्यातील प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले.

30 व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षात

याबाबत प्रांताधिकारी गणेश मरकड कडेगाव तहसीलदार डॉ.शैलजा पाटील व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक वायदंडे यांनी तात्काळ गावास भेट देऊन कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी गेलेल्या 30 व्यक्तींना कडेगाव येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल केले.तर खेराडे वांगीसह तीन किलोमीटर पर्यंतचे क्षेत्र प्रतिबंधात्मक क्षेत्र केले असून येथे शंभर टक्के लॉक डाऊन केले आहे.तर खेराडे वांगी येथील प्रकाराने तालुक्यातील नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates: अजित पवार यांच्याकडून दगडूशेठ गणपतीची पूजा सुरू

Ganesh Visarjan 2025: गणेश विसर्जनाच्या दिवशी नैवेद्यात बनवा 'हे' चविष्ट हलवा, बाप्पा प्रसन्न होतील

Asian Hockey Cup 2025 : भारतीय महिलांचा दणदणीत विजय; थायलंडचा ११-० ने धुव्वा

Latest Maharashtra News Updates : अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण तूर्त स्थगित, मंत्री अतुल सावे यांच्या आश्वासनानंतर निर्णय

Vijay Wadettiwar: सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक: काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार; 'ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष उभा केल्याचा आरोप'

SCROLL FOR NEXT