The funeral took place right from the video calling 
कोल्हापूर

काकूचे अंत्यदर्शन घेतले व्हिडिओ कॉलिंगवरूनच ; कोरोनाच्या संचारबंदीने केला नाइलाज...

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर - काकूचे निधन झाले म्हणून ती बांद्यावरून (गोवा-महाराष्ट्र सिमा) कोल्हापुरात येत होती. तिला सिंधुर्दुग पोलिसांनी सोडले. पण आजरा पोलिसांनी अडवून धरले. ती वारंवार विनंती करीत होती. काकूचे निधन झाल्याचे सांगत होती. तरीही आजरा पोलिसांनी तिला पुढे सोडले नाही. अखेर नातेवाईकांनी व्हिडिओ कॉलिंग करून तिला काकूचे अंत्यदर्शन घडवून दिले. आणि अखेर ती कोल्हापुरात न येताच बांद्याला परत गेली. माणुसकीच्या नात्याने किमान बाराव्या दिवशी तरी तिला घरी येऊ दे, यासाठी कुटुंबीय धडपडत आहेत.

येथील जवाहरनगर नगरातील सुनंदा किशोर भोसले (वय 58) यांचे काल निधन झाले. त्यांची पुतणी गीता ऊर्फ चिंगू भोसले-गवस ही सध्या बांदा (गोवा सीमाभाग) येथे राहते. विवाहानंतर ही ती वारंवार माहेरीच्या कुटुंबियांची, काकूच्या तब्बेतीची चौकशी करत होती. अचानक सुनंदा यांना हृदविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. चिंगू येणार म्हणून मृतदेहाचे अत्यंविधी थांबले होते. ती बांद्यापासून पोलिसांना विनंती करत ती आजऱ्यापर्यंत पोचली. तेथील पोलिसांनी तिला पुढे कोल्हापूरकडे सोडण्यास नकार दिला. गारगोटी मार्गे जातो म्हणू ही तीने विनंती केली. मात्र पोलिसांना निधन झाल्याचे पटत नव्हते. अखेर चिंगून माहेरी फोनवरून संपर्क साधला. कुटुंबीयांनी थेट व्हिडिओ कॉलींग केले आणि पोलिसांना मृतदेह दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हा कॉल पाहण्यासाठीही नकार दिला. तिने वारंवार विनंती केली. केवळ अंत्यदर्शन घेऊन आम्ही लगेच परत येतो असे सांगितले. यावर पोलिसांनी सांगितले, की आम्ही येथून सोडले तरीही पुढे अडवणार आहेत. तेथे तुमची गाडी जप्त केली जाईल. तुम्हाला किमान पंधरा दिवस गाडी मिळणार नाही. अखेर हतबल झालेल्या चिंगूसमोर परत जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही. तिने व्हिडिओ कॉलिंगगद्वारेच काकूचे दर्शन घेतले. अखेर ती कोल्हापुरात पोचलीच नाही.

व्हिडिओ कॉलिंगनंतर साधारण अर्ध्यातासानंतर चिंगू येणार नाही याची खात्री झाली. कुटुंबियातील पाच जण शववाहिकेत आणि गल्लीतील पाच अशा केवळ दहा जणांनी मृतदेह घेऊन थेट पंचगंगा स्मशानभूमी गाठली. तेथे अत्यंविधी केले. आता नऊ एप्रिलला बारावा दिवस आहे. किमान त्यावेळी तरी चिंगू घरी येऊ शकेल काय यासाठी कुटुंबियाचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

सिंधुदुर्गातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना चिंगूला कोल्हापुरात जाण्यासाठी पत्र ही दिले आहे. मात्र कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र देणाऱ्यावर आणि दाखवणाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढे काय कराचये असा प्रश्‍न असल्याचे चिंगूचे बंधू राहूल भोसले यांनी सांगितले. संचारबंदी आम्हीही पाळतो. किमान माणुसकीच्या नात्याने बहिणाला घरी पोचवावे, यासाठी मृत्यूचा दाखला पहावा, असेही भोसले यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT