In Gadhinglaj Action Against Those Who Do Not Use Masks Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

कारवाईसाठी अधिकारी "ऑन फिल्ड', गडहिंग्लज तालुक्‍यात एवढ्या व्यक्तींकडून दंड वसूल

अजित माद्याळे

गडहिंग्लज : शहरासह ग्रामीण भागातही कोरोना पाय पसरत आहे. पाहता-पाहता रुग्णसंख्येचा आलेख उंचावत आहे. अशा परिस्थितीत अजूनही नागरिक मास्क न वापरता निष्काळजीपणे वावरत आहेत. यासाठी खुद्द तहसीलदार दिनेश पारगे यांनीच रस्त्यावर उतरून कारवाईसाठी पुढाकार घेतला. दोन दिवसांपासून सुरू केलेल्या या कारवाईत 147 लोकांकडून 15 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

गडहिंग्लज शहर आणि तालुक्‍यातील विविध गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. 580 रुग्ण तालुक्‍यात पॉझिटिव्ह आहेत. दुसऱ्या बाजूला बेड मिळेनासे झाले आहेत. ऑक्‍सिजनचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असताना मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्स न पाळणे, दुकानदाराकडे हॅंडग्लोज, सॅनिटायझर नसणे आदी प्रकार सर्रासपणे पाहायला मिळत आहेत.

यामुळे तहसीलदार दिनेश पारगे यांनी ग्रामीण भागातील यंत्रणेला जागे करून मास्क न वापरणारे नागरिक, हॅंडग्लोज न वापरणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची सूचना केली. एवढेच नव्हे, तर त्यांनी स्वत: ग्रामीण भागात फिरून दंडात्मक कारवाईसाठी पुढाकार घेतला. आजअखेर भडगाव, महागाव, नेसरी, दुंडगे, मुत्नाळ, नेसरी आदी भागातून दहा हजारांहून अधिक दंड वसूल केला आहे. यासाठी ग्रामदक्षता समिती, ग्रामसेवक, तलाठी, मंडल अधिकारी, दक्षता समितीच्या सदस्यांना सामावून घेतले असून, त्यांच्यामार्फत दंडवसुली मोहीम गतीने राबविले जात आहे. 

असा आहे दंड.... 
- विनामास्क फिरणे 100 रुपये 
- विनामास्क, विना हॅंडग्लोज दुकानदारांना 500 रुपये 
- फळ विक्रेते, भाजी विक्रेत्यांना 200 रुपये 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT