Gadhinglaj Had Lower Fish Prices Kolhapur Marathi News
Gadhinglaj Had Lower Fish Prices Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

आवक वाढल्याने माशांचे दर निम्म्यावर

दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : येथील मच्छी बाजारात समुद्री माशांची आवक वाढल्याने दर निम्म्यावर आले. दर कमी झाल्याने खवय्यांची मासे खरेदीसाठी गर्दी होती. तुलनेत चिकन, मटणाचे दर स्थिर आहेत. मागणीपेक्षा आवक कमी झाल्याने गेल्या आठवड्यापेक्षा फळभाज्यांचे दर तेजीत आहेत. सरासरी वीस टक्के दर वाढले आहेत. फळबाजारात काश्‍मीर परिसरातून सफरचंदाची आवक वाढल्याने दर उतरले आहेत. डाळिंब, मोसंबी यांचे दर कमी आहेत.

गेल्या महिनाभरापासून समुद्री माशांची आवक सुरू झाली. सुरवातीला मागणी जास्त असली तरी आवक जेमतेम असल्याने माशांचे दर तेजीत होते. सुरमई, पापलेट यांचे दर सरासरी हजार रुपये होते. गेल्या आठ दिवसांपासून कोकणातून होणाऱ्या माशांच्या आवकेत दुपटीने वाढ झाली. परिणामी, दर निम्म्यावर आल्याचे विक्रेते आसिफ बोजगर यांनी सांगितले. दर कमी झाल्याने खवय्यांचीही मासे खरेदीसाठी गर्दी आहे. नदी, तलावातील माशांची आवक कमी झाली आहे. खेकड्यांची आवक कमी असून 200 ते 300 रुपये दर आहेत. चिकन, मटणाचे दर स्थिर आहे. चिकन 180 ते 200 तर मटण 600 रुपये किलो असा दर आहे. 

गेल्या दोन महिन्यांपासून पालेभाज्यांची आवक कमी असल्याने दर चढे आहेत. पेंढीला 15 रुपये मोजावे लागत आहेत. लाल भाजी, मेथी, पालक, शेपू या भाज्यांची आवक जेमतेम आहे. या दरवाढीत आता फळभाज्यांची भर पडली आहे. मागणी आधिक आवक कमी यामुळे ही अवस्था झाल्याचे भाजीपाला तालुका खरेदी-विक्री केद्रांचे महादेव तराळ यांनी माहिती दिली.

ढब्बू, भेंडी, दोडका, वांगी, हिरवी मिरची यांचे दर सरासरी वीस टक्‍क्‍यांनी वाढले. किलोचा दर 80 रुपयांवर पोहोचला. काश्‍मिरी डिलीसियस सफरचंद थोडे मऊ असल्याने त्यापेक्षा हिमाचलवरून आलेल्या कडक सफरचदांना ग्राहकांची पसंती आहे. सफरचंदाचा किलोचा दर दर्जानुसार 80 ते 120 रुपयांपर्यत असल्याचे विक्रेते गजानन कांबळे यांनी सांगितले. डाळिंब, मोसंबी 60 ते 80 रुपयापर्यंत किलो आहेत. केळी 40 ते 60 रुपयांपर्यत डझन आहेत. 

माशांचे किलोचे दर रुपयांत 
सुरमई.............400 
पाढंरा पापलेट....600 
फ्रॉंझ..............400 
बोंबील............160 
बांगडा.............200 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT