Gadhinglaj Has 192 Elections In The New Year Kolhapur Marathi News
Gadhinglaj Has 192 Elections In The New Year Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लजला नव्या वर्षात 192 संस्थांच्या निवडणुका

अवधूत पाटील

गडहिंग्लज : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गडहिंग्लज तालुक्‍यातील 192 संस्थांच्या निवडणुकाही पुढे गेल्या आहेत. यामध्ये 62 विकास सेवा संस्था तर 53 पतसंस्थांचा समावेश आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणुका स्थगित होण्याची ही तिसरी वेळ आहे. आता या संस्थांची निवडणूक नव्या वर्षातच होणार आहे. 

गेल्या तीन-चार दशकात सहकार चळवळ गावागावात विस्तारली. विकास सेवा संस्थांसह पतसंस्था, दूध संस्थांचे जाळे निर्माण झाले आहे. याच संस्था गावच्या आर्थिक विकासाची नाडी बनल्या आहेत. आर्थिक सत्ता केंद्र झाल्याने राजकारणाच्या दृष्टीने सहकारी संस्थांचे महत्व वाढले. गावपुढाऱ्यांनाही या माध्यमातून गावावर वर्चस्व निर्माण करण्याची संधी मिळाली. त्यामुळे सहकारी संस्थेवरील सत्तेसाठी मोठी रस्सीखेच चालते. विशेषत: विकास सेवा संस्थेच्या सत्तेसाठी अधिक चुरस असते. 

गडहिंग्लज तालुक्‍यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना जानेवारी महिन्यापासून सुरवात झाली. काही संस्थांचे निवडणूक कार्यक्रमही लागले होते. दरम्यान, मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला. त्यामुळे जून महिन्यापर्यंत निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव जैसे-थे राहिल्यामुळे जूनमध्ये पुन्हा तीन महिन्यासाठी स्थगित झाल्या. आता पुन्हा तिसऱ्यांदा तीन महिन्यासाठी निवडणुका पुढे गेल्या आहेत. त्यामुळे आता या संस्थांच्या निवडणुका नव्या वर्षातच होणार हे स्पष्ट झाले आहे. 

गडहिंग्लज तालुक्‍यातील सर्वाधिक 62 विकास सेवा संस्थांच्या निवडणुकांचा यामध्ये समावेश आहे. याच संस्थेवरील सत्तेसाठी मोठी रस्सीखेच असते. विकास सेवा संस्थेच्या निवडणुका असणाऱ्या गावातीलच ग्रामपंचायत निवडणुकाही होणार आहेत. त्यामुळे गावपुढाऱ्यांकडून या दोन्हींचा मेळ घालूनच रणनीती ठरविली जात आहे. त्याखालोखाल 53 पतसंस्थांच्या निवडणुका आहेत. मजूर, औद्योगिकसह अन्य संस्थांची संख्या 77 आहे. 

या संस्था निवडणुकीला पात्र 
- विकास सेवा संस्था.......... 62 
- पतसंस्था...................... 53 
- मजूर संस्था................... 23 
- औद्योगिक संस्था............. 41 
- इतर............................. 13 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: मुंबई उत्तर मध्यमधून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

SCROLL FOR NEXT