Gadhinglaj Has A Covid Center, But No Physician Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

कोविड सेंटर आहे, पण फिजीशियन नाही... गडहिंग्लजला रूग्णांवर होणारे उपचार बंद; "या' संघटनेने वेधले लक्ष

अजित माद्याळे

गडहिंग्लज : शेंद्री माळावरील शासकीय वसतीगृहात कोविड काळजी केंद्र सुरू केले आहे. परंतु, या ठिकाणी फिजीशियन डॉक्‍टरांची अद्यापही नेमणूक केलेली नाही. गोरगरीब इतर रूग्णांवर होणारे उपचार बंद करून उपजिल्हा रूग्णालयही कोविड समर्पित केंद्रासाठी घेतले आहे. कोरोना रूग्णांची वाढ लक्षात घेता याठिकाणी तत्काळ फिजीशियन डॉक्‍टरांची नेमणूक करण्याची मागणी जनता दलाने केली आहे. 

यासंदर्भात जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन देवून लक्ष वेधले आहे. कृत्रिम श्‍वासोच्छवासाठी व्हेंटीलेटरही उपलब्ध नसल्याने रूग्ण मृत्यू प्रमाणात वाढ झाल्याचेही निवेदनात म्हटले आहे. सध्या अनेकांना मधुमेह आणि रक्तदाब आहे. अशा लोकांना कोरोनाची लागण तत्काळ होत आहे. त्यांना श्‍वासोच्छवास घेण्याचा त्रास होत आहे.

अशा अवस्थेत कोविड केंद्राला फिजीशियन डॉक्‍टर उपलब्ध नाहीत. कोरोनामुळे जे मृत्युमुखी पडत आहेत, त्यात रक्तदाब, मधुमेही या व्याधीग्रस्तांचा अधिक समावेश आहे. अशा रूग्णांसाठी कृत्रिम श्‍वासोच्छवास यंत्र उपलब्ध करणेही गरजेचे आहे. या अपुऱ्या यंत्रणेमुळे गरीबांना प्राण गमवावा लागत आहे.

मुळात कोविड केंद्रात सामान्य गरीब रूग्ण दाखल होत आहेत. त्यांची प्रकृती खालावल्यानंतर कोल्हापूरला रेफर केले जाते. परंतु सध्याच्या पूरपरिस्थितीमुळे तो रूग्ण कोल्हापूरला लावू शकत नाही. अशा रूग्णांनी जगण्याची आशा सोडायची का, गरीब रूग्णांनी करायचे तरी काय हा प्रश्‍न आहे. तसेच नेसरी व गडहिंग्लजमधील मृत्यू झालेल्या व्यक्तीची आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वानुसार टेस्ट केली होती काय, असेही विचारण्यात आले आहे. 

तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, नगराध्यक्षा स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष शकुंतला हातरोटे, कार्याध्यक्ष उदय कदम, सचिव बाबुराव धबाले, नगरसेवक महेश कोरी, नगरसेवक नरेंद्र भद्रापूर, नगरसेविका श्रद्धा शिंत्रे, सुनिता पाटील, शशिकला पाटील, नाझ खलीफा, क्रांती शिवणे, वीणा कापसे, जमीर मुल्ला, इम्रान मुल्ला, ताहीर कोचरगी, सादीक हुसेन आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

...अन्यथा उपोषण करू 
कोविड केंद्रात मृत्यू झालेला रूग्ण चार-पाच तास बेडवरच असतो. इतर पॉझीटीव्ह रूग्ण या मृतदेहाकडे उघड्या डोळ्यांनी पाहतात. त्याचा विपरीत परिणाम इतर रूग्णांवर होत आहे. मृत्यू झालेल्यावर अंत्यविधी करण्याची कोणतीही यंत्रणा कोविड केंद्रात उपलब्ध नाही. या साऱ्या प्रश्‍नाकडे प्रशासन लक्ष देणार का, कोरोना बाधिताचा मृतदेह नेण्यासाठी शववाहिका मिळणार का आदी प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. या मागण्या आठ दिवसात मान्य करा, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT