ज्योत्स्ना जयवंतराव देसाई या तरुण शेतकरी  sakal
कोल्हापूर

गडहिंग्लज : मधातून मिळविले तीन लाखांचे उत्‍पन्‍न

अर्जुनवाडीच्या ज्योत्स्ना देसाईंचे यश; शेतीला पूरक व्यवसायावरही भर

दिनकर पाटील

नेसरी : अर्जुनवाडी गडहिंग्लज येथील देसाईवाडीतील ज्योत्स्ना जयवंतराव देसाई या तरुण शेतकरी उद्योजिकेने कृषी पदवी संपादन केल्यानंतर शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मधुमक्षिका पालन सुरू केले. याद्वारे त्यांना वर्षाला तीन लाखांचे आर्थिक उत्पन्न मिळते. त्यांनी स्वतःचा ‘मधुऐश्‍वर्य’ मधाचा ब्रँड विकसित केला आहे.

देसाई यांना शेतामध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याची आवड आहे. गेल्या वर्षी देसाई यांनी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून आधुनिक यंत्राद्वारे भात कापणी प्रात्यक्षिकाचे आयोजन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. वडिलांचा पारंपरिक शेती व्यवसाय जोपासत त्यांनी जोडधंदा म्हणून मधुमक्षिका पालन व्यवसाय सुरू केला. सातेरी, पोयाच्या (ट्रॅगोना), युरोपियन मधमाश्‍यांचे पालन त्या करतात. मधा बरोबरच त्यातील पोलन, रॉयल जेली, मेण, बी व्हेनम, प्रपॉलिश, एपी थेरपीसाठी होणारा उपयोग यासंदर्भातील बाजारपेठेची माहिती देसाई यांनी करून घेतली आहे. यातूनही त्यांना आर्थिक उत्पन्न मिळत आहे. मधमाश्‍यांमुळे पिकाचे परागी भवन उत्कृष्ट पद्धतीने होते.

त्यामुळे शेतीचे उत्पादन तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढण्यास मदत होते. मधमाश्‍यांच्या पेट्या परागीभवनासाठी भाडेतत्त्वावर देऊन ही पैसे मिळवता येतात. हेही देसाई मधुमक्षिका पालनातून दाखवून देत आहेत. शेतात रोपवाटिका, अांतरपिके यांच्या माध्यमातून शेती उत्पन्न वाढीसाठी शेतात वेगवेगळे प्रयोग त्या करतात. मधपेटी, मध यंत्र, स्मार्ट नेट, सुरी, बी व्हेल, मधमाश्‍या यांची आवश्यकता असते. यासाठी सुमारे २५०० खर्च अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.

मधाचा ब्रँड विकसित

मध उत्पादनातून चांगले उत्पन्न मिळते आहे. याचा विचार करून ज्योत्स्ना देसाई यांनी ‘मधुऐश्‍वर्य’ हा मधाचा स्वतःचा ब्रॅंड विकसित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

SCROLL FOR NEXT