In Gadhinglaj Market Chilli Incoming Increased Kolhapur Marathi News
In Gadhinglaj Market Chilli Incoming Increased Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लज मिरचीची आवक वाढली

दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : येथील आठवडा बाजारात मिरचीची आवक वाढली आहे. भाजी मंडईत कोबी, पालेभाज्या, कोथिंबीर, टोमॅटोची आवक अधिक असुन दर कमी आहेत. फळबाजारात द्राक्षाची आवक अधिक असल्याने दर स्वस्त झाले आहेत.

जनावरांच्या बाजारात म्हैशी, शेळ्या मेंढ्यांची आवक टिकून आहे. 
गेल्या दोन महिन्यापासून बाजारात मिरचीची आवक सुरू झाली. ग्रामीण भागासह लगतच्या सीमाभागातील शेतकरी मिरची विक्री साठी आणत आहेत. यंदा झालेल्या विकमी पावसामुळे मिरचीचे उत्पादन सरसरी पन्नास टक्के कमी आहे. त्यामुळेच जवारी मिरचीला उचाकी भाव मिळत आहे. जवारी मिरची दजानुसार 400 ते 800 रूपये किलो आहे. ब्याडगी मिरची दीडशे ते साडेतीनशे रुपये किलो आहे. उन्हाळ्यातच घरगुती वापरासाठी महिला मिरची खरेदी करतात. 

पालेभाज्या 3 ते 4 रुपये तर कोथिंबीर 3 ते 5 रूपये पेंढी असा भाव आहे. तुलनेत कोबी आणि टोमॅटोची सर्वाधिक आवक आहे. काकडी आणि मिरचीचे दर मागणीमुळे तेजीत आहेत. दहा किलोचे दर असे : कोबी-100 रुपये, टोमॅटो-120, हिरवी मिरची-250, दोडका - 225,काकडी- 300 रूपये. 
म्हैशीची आज 220 पेक्षा अधिक आवक झाल्याचे बाजार समितीतुन सांगण्यात आले. 25 ते 90 हजारापर्यंत दर होते. यंदा पाऊस चांगला झाल्याने हिरव्या चाऱ्याची उपलब्धता अधिक आहे.

परिसरात यात्रा, जत्रा सुरू झाल्यामुळे बकरी आणि मेंढ्यांना मागणी वाढली आहे. परिणामी, दर वधारले आहेत. शेळ्या मेंढ्याची सुमारे 200 पेक्षा अधिक आवक होती. 5 ते 15 हजार दर होते. बैलजोड्यांची आवक मात्र तुरळक आहे. 

कांदा 1000 ते 1400 क्विंटल तर किरकोळ बाजारात 15 ते 25 रुपये अशी विक्री सुरू आहे. काश्‍मीर परिसरातुन येणाऱ्या सफरचंदाची आवक कमी झाल्याने दर कडाडले आहेत आहेत. 180 ते दोनशे रुपये किलो असा भाव आहे. केळी 25 ते 40 रुपये डझन आहेत. संत्री 60 ते 80 रुपये किलो आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT