Gadhinglaj Municipality Waiting for 10 crore to Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

मंजूर 10 कोटींची गडहिंग्लजला प्रतीक्षा

अजित माद्याळे

गडहिंग्लज : शहरासह हद्दवाढ क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी गडहिंग्लज पालिकेला वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत दहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे. प्रस्तावित कामांना जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. परंतु, मंजूर निधी अद्याप पालिकेला मिळाला नसून तो तत्काळ द्यावा, असे साकडे नगराध्यक्ष स्वाती कोरी यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना घातले आहे. 

दरम्यान, हा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्‍वासन मुश्रीफ यांनी या वेळी दिले. विविध विकासकामांसाठीच्या अनुदानसंदर्भात कोरी यांनी मंत्रालयात मंत्री मुश्रीफ यांची भेट घेऊन निवेदन दिले. निधी मिळण्यासाठी शिफारस करण्याची मागणीही कोरी यांनी या वेळी केली. दीड वर्षापूर्वी शहराची हद्दवाढ झाली आहे. त्यानंतर नव्या प्रभागाची निवडणूक होऊन नगरसेवकही निवडून आले.

दरम्यान, या हद्दवाढीच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मूळ शहरातील विकासकामांसाठीही पाच कोटी मंजुरीचे पत्र आले. यामध्ये बहुतांश रस्ते आणि गटारींच्या कामांचा समावेश आहे, मात्र अद्याप हा मंजूर निधी पालिकेला मिळालेला नाही. मंजूर असलेला दहा कोटींचा निधी मिळाल्यास शहरवासीयांसह हद्दवाढीतील नागरिकांची गैरसोय दूर होणार असल्याचे कोरी यांनी या वेळी सांगितले. 

तसेच विशेष रस्ता योजनेतून 2018-19 साठी एक कोटीचे अनुदान मंजूर झाले आहे. परंतु, हा निधीही अद्याप मिळाला नसून त्यासाठीही शिफारस करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रारूप विकास योजना आराखड्यात आरक्षण क्र. 20 मध्ये सांस्कृतिक केंद्र व वाचनालयासाठी 8 कोटी 74 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. या निधीसह विरोधी पक्षनेते हारुण सय्यद यांनी सुचवलेल्या विकासकामांसाठी दीड कोटीच्या निधीची गरज असून हा निधीही मिळावा, अशी मागणी सौ. कोरी यांनी केली आहे. यावेळी सागर पाटील व विनोद बिलावर उपस्थित होते. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Live Updates Marathi: जंतरमंतरवर पोलिसांचा पुन्हा लाठीचार्ज

Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

CJP Protest: राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला जे.पी. नड्डांचं उत्तर; काँग्रेस सत्तेत असलेल्या राज्यातील पेपरफुटीचा वाचला पाढा

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

Stray Dog Attack : सहा महिन्याच्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT