Gadhinglaj Municipality Will Launch An Anti-Plastic Campaign Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लज पालिका प्लास्टिक विरोधी मोहिम राबवणार

अजित माद्याळे

गडहिंग्लज : शहरात सध्या बहूतांशी फिरते विक्रेते आणि दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर करीत आहे. यामुळे कचऱ्यात प्लास्टिकचा हिस्सा वाढत चालला असून तो आरोग्याला घातक असल्याचे सांगूनही संबंधित विक्रेते ऐकायला तयार नाहीत. यामुळे पालिका आता प्लास्टिक विरोधी कडक धोरण अवलंबले असून उद्यापासूनच (ता. 19) ही मोहिम राबवणार आहे. आठ दिवसात शहर प्लास्टिकमुक्त करण्याचे लक्ष्य असल्याचेही उपनगराध्यक्ष महेश उर्फ बंटी कोरी यांनी सांगितले. 

पालिकेने प्लास्टिक बंदीचे आवाहन करून अंमलबजाणी सुरू केली होती. सर्व दुकानदार, फिरते विक्रेते, तात्पुरते विक्रेत्यांना कॅरीबॅग बंद करण्याची सूचना केली. न ऐकणाऱ्या व्यापाऱ्यांवर प्लास्टिक जप्तीची कारवाई केली. दंडाची वसूलीही सुरू झाली. त्यामुळे शहरात प्लास्टिक कॅरीबॅग वापरण्यावर मर्यादा आल्या. कापडी आणि कागदी पिशव्यांवर भर राहिला. काही महिला बचत गटांनीही कापडी पिशव्यांच्या निर्मितीचा व्यवसाय सुरू केला आहे. दुकानांमध्ये कापडी पिशव्या विक्रीसाठीही आहेत. 

दरम्यान, कोरोनामुळे लॉकडाऊन आला आणि या मोहिमेला ब्रेक लागला. अनलॉक झाल्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले. आता तर संपूर्ण बाजारपेठ सुरू झाली आहे. फिरते विक्रेतेही मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु, पालिका प्रशासनाकडून प्लास्टिक विरोधी मोहिम काहीशी शिथील झाल्यानंतर पुन्हा प्लास्टिकचा वापर वाढू लागला आहे.

विशेषत: सर्वच फिरत्या विक्रेत्यांकडे प्लास्टिक बॅगा असून त्याचा सर्रास वापरही सुरू केला आहे. यामुळे गटारींमध्ये प्लास्टिक पिशव्या आणि कचऱ्याच्या ढिगातही प्लास्टिक वाढला आहे. मुळात त्याचे विघटन होत नसल्याने त्याच्या विल्हेवाटीची अडचण येत आहे. यामुळे पर्यावरण प्रेमीतून नाराजीही व्यक्त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर पालिकेने आता पुन्हा एकदा प्लास्टिक विरोधी मोहिम राबवणार आहे. पहिल्यांदा सूचना आणि त्यानंतर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. 

गांधीगिरी पद्धतीने स्वागत होणार
गडहिंग्लजमध्ये अजूनही दुकानदार, फळ, फूल विक्रेत्यांकडून प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर सुरू आहे. पालिकेकडून कितीही सूचना दिल्या तरी संबंधित घटक ऐकायला तयार नाहीत. यापुढे प्लास्टिक कॅरीबॅग देताना दिसल्यास त्यांचे गांधीगिरी पद्धतीने स्वागत होणार आहे. पालिका प्लास्टिक विरोधी कडक धोरण राबवून दंडात्मक कारवाई करणार आहे. यामुळे प्लास्टिमुक्त गडहिंग्लजसाठी व्यापारी आणि नागरिकांनी सहकार्य करावे. 
- महेश उर्फ बंटी कोरी, उपनगराध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रातील विद्यापीठांवर राज्यपालांची कडक नजर! त्रैमासिक अहवाल सादर करणे अनिवार्य; प्रशासनाला नवा धक्का

R Ashwin ने कसोटीतून निवृत्तीसाठी गौतम गंभीरला ठरवले जबाबदार? पर्थ कसोटीत काय घडले ते सांगितले... मन मोकळे केले...

Latest Marathi News Live Update :एलपीजीची परिस्थिती अजूनही चिंताजनक: सरकार

"साडी चुरगळू नये म्हणून ती.." प्रसिद्ध डिझायनरचा ऐश्वर्याविषयी धक्कादायक खुलासा; म्हणाला..

Gudipadwa: गुढीपाडव्याला घरपोच पुरणपोळी! महापालिकेचा उपक्रम; ऑर्डर करण्याची प्रक्रिया काय?

SCROLL FOR NEXT