Gadhinglaj Panchayat Samiti First In The State Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लज पंचायत समिती राज्यात पहिली

अवधूत पाटील

गडहिंग्लज : शासनाच्या योजनांची अंमलबजावणी व प्रशासकीय कामकाजात येथील पंचायत समिती राज्यात पहिली आली. राष्ट्रीय पातळीवरील दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार जाहीर झाला. भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे हा पुरस्कार दिला जातो. 25 लाख रूपये पुरस्काराची रक्कम आहे. पंचायत समितीच्या कामकाजातील पदाधिकाऱ्यांच्या सहभागाचाही विचार या पुरस्कारासाठी केला जातो. 

केंद्र व राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारात येथील पंचायत समिती नेहमीच अग्रेसर राहिली आहे. यशवंत पंचायत राज्य अभियानमध्ये तर वेगळा ठसा उमटविला आहे. आतापर्यंत पुरस्कारापोटी मिळालेली रक्कम सव्वा कोटींच्या पुढे गेली आहे. यामुळे पंचायत समिती स्तरावर नावीन्यपूर्ण योजना राबविताना आर्थिक पाठबळ मिळाले आहे. आता यामध्ये केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराची भर पडली आहे.

शासनाच्या योजनांची अंमलबजावणी, प्रशासकीय कामकाजातील गतिशीलता, मासिक सभांचे कामकाज, पंचायत समितीच्या कामकाजात पदाधिकाऱ्यांचा सहभाग, महिला-मागास प्रवर्गातील सदस्यांनी मांडलेले प्रश्‍न यासह विविध मुद्यांचा विचार पुरस्कारासाठी करण्यात आला. पहिल्या टप्प्यात जिल्हास्तरीय समितीकडून तर दुसऱ्या टप्प्यात कोकण विभागाच्या पथकाने तपासणी केली होती. यशवंत पंचायत राज्य अभियानात यंदा गडहिंग्लजला हुलकावणी मिळाली होती. विभागीय स्तरावरील दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. पंचायत सशक्तीकरण पुरस्काराने त्याची भरपाई झाली. 

सहा वर्षात दुसऱ्यांदा मोहर... 
येथील पंचायत समितीने दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारावर दुसऱ्यांदा मोहर उमटविली आहे. यापूर्वी 2014-15 सालचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार गडहिंग्लज पंचायत समितीने पटकाविला होता. सहा वर्षानंतर त्याची पुनरावृत्ती झाली आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

SCROLL FOR NEXT