हिरण्यकेशी नदीवरील गोटूर बंधाऱ्याजवळ  sakal
कोल्हापूर

गडहिंग्लज : हिरण्यकेशी नदी वाहिली उलट्या दिशेने

गोटूर बंधाऱ्याजवळ आश्‍चर्यकारक प्रकार पूर्वेकडून पश्‍चिमेकडे पाण्याचा प्रवाह

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज : हिरण्यकेशी नदीवरील गोटूर बंधाऱ्याजवळ शनिवारी (ता. १८) सायंकाळी आश्‍चर्यकारक घटना पाहायला मिळाली. कर्नाटकातील मुसळधार पावसाने ओढ्याचे पाणी मोठ्या प्रमाणात हिरण्यकेशी नदीत आले, पण हे पाणी पूर्वेला कर्नाटकात जाण्याऐवजी उलट्या दिशेनेच पश्‍चिमेकडे (राष्ट्रीय महामार्गाकडे) वाहू लागले. नागरिकांनी बंधाऱ्याजवळ गर्दी केली होती.

हिरण्यकेशी नदी पश्‍चिमेकडून पूर्वेकडे वाहते. शनिवारी सायंकाळी कर्नाटकातील निडसोशी, कमतनूर, गोटूर व पंचक्रोशीत ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस झाला.यामुळे या भागातील ‘कापूर’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले. हा ओढा हिरण्यकेशी नदीवरील गोटूर बंधाऱ्याच्या पूर्वेला (कडलगेच्या दिशेला) नदीपात्रात येऊन मिळाला आहे. ओढ्याचे हे पाणी नदीपात्रात आले; मात्र ते पूर्वेला जाण्याऐवजी पश्‍चिमेला वाहत होते. नव्या बंधाऱ्यातून राष्ट्रीय महामार्गाच्या दिशेने हे पाणी प्रवाहित झाले. महामार्गावरील पुलापर्यंत हे पाणी पोहचले. नांगनूरच्या जॅकवेलजवळचे पात्रही या पाण्याने भरले. प्रत्येकजण हा आश्‍चर्यकारक क्षण मोबाईलमध्ये कैद करण्याचा प्रयत्न करीत होते. तसेच या घटनेचे आश्‍चर्यही व्यक्त करण्यात येत होते.

१५ वर्षांपूर्वीची पुनरावृत्ती

१५ वर्षांपूर्वीही अशाच प्रकारे मुसळधार पावसाने ओढ्याचे पाणी नदीपात्रात आल्यानंतर ते पश्‍चिमेकडे वाहत असल्याचे नांगनूर परिसरातील काही नागरिकांनी सांगितले. ओढ्याचे पाणी ज्याठिकाणी नदीला मिळते, तेथून पश्‍चिमेच्या दिशेने काहीसा उतार असल्याचेही सांगण्यात आले. यामुळे ओढ्यातून वेगाने येणारे पाणी पश्‍चिमेकडे आल्याचा अंदाज बांधला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Court Bomb Threat: बीड जिल्हा न्यायालय उडवून देण्याची धमकी! ईमेलमुळे खळबळ, बॉम्ब शोध पथकाकडून संपूर्ण न्यायालयाची कसून तपासणी

Farmer Organizations: प्रतिटन ३८५० रुपयांचा तोडगाही अमान्य; जयसिंगपुरात बैठक; पाच हजार रुपयांवर शेतकरी संघटना ठाम, दराचा तिढा कायम!

ना दुकान, ना मोठी गुंतवणूक! दिलजीतच्या कॉन्सर्टमध्ये पाणी विकून दोन तासांत कमावले हजारो रुपये, तरुणाचा Video Viral

Who Was BB Nimbalkar? कोल्हापूरचा डॅशिंग क्रिकेटपटू! ज्याच्या नाबाद ४४३ धावांनी वादळ उठवले! 'राजा'ने सामना सोडला नसता तर ब्रॅडमनचा विश्वविक्रम मोडला असता...

मन आजही तुमची वाट पाहतंय; वडिलांच्या वर्षश्राद्धादिवशी प्रार्थना बेहेरे भावुक; कावळ्याने घास घेतल्याचा व्हिडीओ केला शेअर

SCROLL FOR NEXT