Ganesh Chaturthi 2022  sakal
कोल्हापूर

Ganesh Chaturthi 2022 : चपाती-भाकरी व्यवसायातून रोजीरोटी

भोईटे भगिनींच्या कष्टाला मिळतो आधार

मोहन मेस्त्री :

कोल्हापूर : लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले, आम्ही तिघी बहिणी तिशीत असतानाच भावांचेही आकस्मित निधन झाले. भाऊ गेल्यानंतर ‘खाली जमीन वर आकाश’ अशी अवस्था होती. यावेळी ज्याच्या पायाशी बालपण गेले, त्या गणपतीनेच आम्हाला सावरले. बाप्पाच्या कृपेने जोडलेल्या माणसांमुळं आम्हाला कष्ट करून चार घास खाण्याचे बळ मिळाले, आठ नंबर शाळेजवळच्या सुमती भोईटे आणि अरुंधती भोईटे संवाद साधत होत्या आणि घरासमोरील सार्वजनिक गणपतीच्या साक्षीनेच त्यांचा एकूणच प्रवास उलगडत असतो.

आठ नंबर शाळेजवळ शाहूकालीन चाळ आहे. चाळीतील एका घरासमोर ‘चपाती करून मिळेल’ असा पुठ्याचा फलक दिसतो. येथे राहणाऱ्या भोईटे भगिनीच्या लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. तीन बहिणी आणि दोन भाऊ असं हे कुटुंब. संसाराचा गाडा कसाबसा ओढला जात असतानाच दोन्ही भावांचे पाठोपाठ हृदयविकाराने निधन झाले आणि या कुटुंबावर आघात कोसळला. सुमती सांगतात, ‘‘देवाने भावांचा आधार नेला तरी गजानन कृपेने आम्हाला अशी माणसे जोडून दिली, की त्यांच्या कृपेमुळे डोक्यावर छप्पर राहिले आणि दोनवेळ जेवून जीवन जगता येईल, असा चपाती, भाकरी करून द्यायचा व्यवसाय सुरू आहे.

आम्ही बहिणींनी आमचं उभं आयुष्यच या गजाननाच्या पुढ्यात सोडलं आहे. तो सांभाळतो आणि आम्ही जगतो आहोत. घरात गणपती आणता येत नाही; परंतु ‘शाळेजवळचा गणपती’ हीच आमची श्रद्धा आहे. पदरी कोणतीही पैशाची शिदोरी नव्हती. भाड्याचे घर होते, अशा परिस्थितीत चाळीच्या मालकाने घर सोडण्यास तगादा लावल्यानंतर माजी नगरसेवक उत्तम कोराणे यांनी या तिघा बहिणींना घर घेऊन दिले. तुमची इच्छा असेपर्यंत राहा, असे सांगितले आणि जेवणासाठी अनेक मित्रांना चपात्या येथून नेण्यासाठी आग्रह केला. त्यात महादेव धडाम या सराफ व्यावसायिकानेही हातभार लावल्याचे या बहिणी सांगतात.

गणेश चतुर्थीला लाडू प्रसाद

तिशीच्या वयात असताना कोण नोकरी देईल, अशी परिस्थिती नव्हती. अशा वेळी ताठ मानेने राहण्यासाठी चपाती, भाकरी करून द्यायचे काम सुरू केले. कोल्हापूर म्हणजे रस्सा मंडळाचे गाव आहे. त्यामुळे अनेकांना त्यांच्या चपाती भाकरी मिळतात माहीत झाले. या दोन बहिणी थोरल्या विधवा बहिणीसह मोठ्या जिद्दीने आई-वडील आणि भावांच्या माघारी चरितार्थ चालवत आहेत. घरात गणेशमूर्ती आणणे शक्य नसल्याने त्या मंडळाच्या गणपतीवर त्यांची श्रद्धा एवढी आहे, की प्रत्येक गणेश चतुर्थीला बाप्पाच्या आवडीचे लाडू प्रसाद करून देताना गणपतीची भक्ती मात्र त्यांनी सोडली नाही.

चला त्‍यांना बळ देऊ

भोईटे भगिनींच्या चपातीच्या व्यवसायाला बळ देण्यासाठी त्यांच्याकडून चपाती घेण्यासाठी या मोबाईलवर संपर्क साधा -९६८९१५७४७२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

SCROLL FOR NEXT