ganesh chavan case khutalwadi shahuwadi kolhapur crime marathi news 
कोल्हापूर

ऐन तारुण्यातच घेतला टोकाचा निर्णय: पंचवीस वर्षीय गणेशचा धक्कादायक प्रकार 

अर्चना बनगे

कोल्हापूर :  पंचवीस वर्षातील युवक ऐन उमेदीच्या काळामध्ये टोकाचे निर्णय घेत आहेत. काय असेल त्यांची  मनस्थिती, का आले असेल नैराश्य? एवढा मोठा टोकाचा निर्णय घ्यावा. आयुष्य संपून जावे. एवढे स्वस्त आहे का जीवन. मागे होणाऱ्या कुटुंबाचे होणारी वाताहत आईचा हंबरडा, का दिसत नाही. नैराश्या एवढे वाढले आहे की, अनेक मुले टोकाचं पाऊल घेऊ लागले आहेत. अशीच एक घटना काल शाहूवाडी तालुक्यात घडली.

काही क्षणात होत्याचे नव्हते झाले 

दुपारचे तळपते ऊन अनेक जण गारवा शोधाच्या प्रयत्नात. पण एवढ्यात करून कसला तरी आवाज येतो. आवाज ऐकताच सर्वांचे लक्ष तीन मजली असणाऱ्या इमारतीवर जाते. 25 वर्षाचा युवक आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असतो. सगळ्यांच्या नजरा भेदरलेल्या. प्रसंगावधान साधून काही तरुणांनी त्याला वाचवले त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये नेले. नियतीला मात्र वेगळेच काहीतरी मान्य होते. काही क्षणात होत्याचे नव्हते झाले आणि अखेर पंचवीस वर्षाच्या युवकांनी आपली जीवन यात्रा संपवली. ही घटना आहे शाहुवाडी तालुक्यातील  खुटाळवाडी या गावातील गणेश चव्हाण या युवकाची.

संवादाचा अभाव ठरला जीवघेणा 

गणेश लहानपणापासूनच एकाकी होता. तो कधी इतरांच्यावर मिक्स होत नव्हता. लहानपणीच वडील गेल सातवीपर्यंत कशीबशी कुडाळवाडी विद्यामंदिर मध्ये त्याने शिक्षण घेतले. सुपर हायस्कूल मध्ये आठवी पास झाला आणि पुढे जाऊन हॉटेलमध्ये वेटर व्यवसाय सुरू करू लागला. घरी आई, एक बहीण. त्यांन घरची जबाबदारी सांभाळायचं  ठरवले. मात्र नियतीला  हे मान्य नव्हते.वेटरचे काम करता करता गणेश कधी व्यसनाच्या आहारी लागला हे त्याला कळलंच नाही. मुळातच सगळ्यांशी संवाद कमी त्यामुळे तो व्यसनाच्या अधीन झाला.  काम मिळत गेले मात्र व्यसनामुळे ते काम हातून लगेच  जाऊ लागले. आणि यातूनच मग त्याला नैराश्य आले.

गावकऱ्यांनी केला पाठलाग पण
काल दुपारी नशेच्या भरात तो शोलेमधील धर्मेंद्र च्या स्टाईलने मध्यपान करून आत्महत्या करण्यासाठी चौथ्या मजल्यावर चढला. काही तरुणांनी प्रसंगावधान साधून त्याला खाली उतरवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. खरंतर पोलिसांनी त्याला दरडावणे गरजेचे होते परंतु तसे झाले नाही. अशी चर्चा आहे. त्यांनी त्याला नातेवाईकांच्या ताब्यात दिले.  संध्याकाळच्या दरम्यान नशेत असल्याने शेजारील असलेल्या चिंचेच्या झाडाला गणेशने गळफास घेऊन आत्महत्या केली. गावातील लोकांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत त्याने आपली जीवनयात्रा संपवली होती. एकुलता-एक असलेल्या गणेश याने  दारूच्या नशेत आत्महत्या  केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

Kantara Chapter 1: ‘कांतारा-चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची एंट्री

Tokyo World Athletics 2025: जागतिक ॲथलेटिक्समध्ये तेजस शिरसेची उपांत्य फेरी थोडक्यात हुकली

Kolhapur Bhakt Niwas Scam : भक्त निवास म्हणून दाखवल्या शाळेच्या खोल्या, निधीचा गैरवापर; माहितीच्या अधिकारात धक्कादायक माहिती, मुख्य सूत्रधार कोण?

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

SCROLL FOR NEXT