Ganesh festival program in Kolhapur Shiv Sena district president Sanjay Pawar statement to the commissioner corporation issue guidelines regard 
कोल्हापूर

श्री.गणेश मुर्तीचे प्रभाग निहाय केंद्रीकरण करत विसर्जन करावे : आयुक्त मल्लिनाथ कल्लशेट्टी

मतीन शेख

कोल्हापूर - कोरोना महामारीचे संकट लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन आयुक्त मल्लिनाथ कल्लशेट्टी यांनी केले आहे. कोल्हापुरातील गणेश विसर्जन कार्यक्रम कसा असेल? तसेच महानगरपालिके कडून यासंबंधी मार्गदर्शक सुचना जाहिर कराव्यात असे निवेदन शिवसेना जिल्हा अध्यक्ष संजय पवार यांनी आयुक्त कल्लशेट्टी यांना दिले, या प्रसंगी ते बोलत होते. 

 श्री गणेश मुर्तींचे प्रभाग निहाय केंद्रीकरण करत गणेश मंडळे व महानगरपालिका यांच्या साह्याने प्रत्येक प्रभागातील चौकामध्ये सोशल डिस्टंन्स पाळत कायली मध्ये विसर्जन पार पाडावे तसेच शहरामध्ये विविध ठिकाणावरुन श्री.गणेश मुर्तीचे एकत्रिकरण करण्यासाठी आणि निर्माल्य गोळा करण्यासाठी महानगरपालिकेकडून १६० ट्रॅक्टर, तसेच कर्मचाऱ्यांची नेमणुक करुन देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.या उपक्रमामध्ये विविध गणेश मंडळे, सामाजिक संस्था, तसेच राजकीय पक्ष संघटनांना सहभागी होण्याचे आवाहन आयुक्त कल्लशेट्टी यांनी केले.

पंचगंगा प्रदुषण मुक्त ठेवूया

 पर्यावरण रक्षणासाठी कोल्हापूरकरांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.यंदा ही कोरोना संकटाच्या काळात घरगुती गणेशमुर्तींचे विसर्जन नागरिकांनी घरीच पार पाडावे तसेच पंचगंगा नदीमध्ये विसर्जन टाळून पंचगंगा प्रदुषणमुक्त ठेवण्यास कोल्हापूरकर नक्कीच हातभार लावतील अशी आशाही आयुक्त कलशेट्टी यांनी व्यक्त केली. 

परवानगीची गरज नाही

गणेश मंडळांनी १० फुट × १० फुट अश्या आकाराचा मंडप उभारावा व विसर्जन कार्य पार पाडावे या मंडप उभारणीसाठी परवानगीची गरज नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. 

मिरवणुक,स्वागत कक्ष यंदा नाहीच 

कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता गणेशोत्सव मिरवणुकांना कोणतीही परवानगी नसणार आहे तसेच गणेश मंडळांचे स्वागत कक्ष उभारले जाणार नाहीत. 

संपादन - अर्चना बनगे
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

Oneplus Nord CE 5 : वनप्लस Nord CE 5 लवकरच होणार लॉन्च; 7100mAh दमदार बॅटरी, आकर्षक फीचर्स अन् किंमत फक्त..

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

SCROLL FOR NEXT