Ganeshotsav 2022 
कोल्हापूर

Ganeshotsav 2022 : गणेशमूर्तीवर झळकणार रंगीत वस्त्र

कोल्हापूरचा ड्रे‍स डिझाइनर पोचला राज्यभर

बी. डी. चेचर

कोल्हापूर : यंदाचा गणेशोत्सव दिमाखात साजरा होत आहे. गणेशमूर्ती सुंदर कशी दिसेल, यावर प्रत्येक भक्तांची इच्छा आहे. त्यामुळे आता विविधरंगी वस्त्रांचा वापर करून कॉस्च्युम डिझाइनर बाप्पाला सजवत आहेत.

गणेशमूर्ती सजीव आणि रेखीव दिसण्यासाठी अनेक मंडळे श्रीगणेशाला धोतर, फेटा, वस्त्रांचा वापर करत आहेत. मंगळवार पेठ कोळेकर तिकटी येथील महाडिक यांची आठवी पिढी प्रथमेश यांच्या रूपाने कुटुंबीय टेलरिंग व्यवसायात आहे. ते सध्या श्री गणेशाला विविधरंगी वस्त्रांच्या माध्यमातून अधिकच सुंदर बनविण्याचे काम करत आहेत. एका गाठीवर श्री गणेशाला धोतर बांधणे ही त्यांची खासियत असून, त्यांच्याकडे पंढरपूरपर्यंतची बुकिंग यंदा आहेत. शहरातील किमान दोनशे मोठ्या व सहाशे छोट्या गणेशमूर्तीवर सध्या कॉस्च्युम करण्याचे काम सुरू आहे. चार वर्षांपासून हा ट्रेंड सुरू झाला असून, त्याला मागणीही मोठी आहे. गणेशोत्सव काळात मंडळाच्या मागणीनुसार दररोज किंवा दोन दिवसआड श्री गणेशाचे धोतर बदण्याचे काम करतात.

छत्रपती शिवाजी महाराज, संत बाळूमामा, श्री स्वामी समर्थ, चिंतामणी, लालबागचा राजा आणि शेकडो रूपातील गणेशमूर्ती सजीव करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच पद्धतीने गणेशोत्सवातील सजीव देखाव्यासाठीही वेशभूषा करण्याचे काम प्रथमेश महाडिक करतात.

कॉस्च्युमचा हा ट्रेंड मुंबई, पेण येथून आता कोल्हापुरातही सुरू झाला आहे. गणेशमूर्तींना पूर्ण गणवेशाची मागणी भक्तांकडून वाढत असल्याने त्या पद्धतीच्या गणेशमूर्ती तयार करत आहोत. त्यामुळे गणेशमूर्ती आकर्षक दिसते व मंडळही विसर्जन करताना तितकीच काळजी घेतली जाते.

- आशिष पाडळकर, मूर्तिकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT