In Ganeshotsav, Chinese items are torn this year 
कोल्हापूर

गणेशोत्सवात यंदा चायनीज वस्तुंना फाटा 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  गणेशोत्सव केवळ तीन दिवसावर आला असून मंडळाच्या मंडप उभारणीला प्रारंभ झाला आहे. सजावटीच्या साहित्य खरेदीसाठीही हळूहळू गर्दी होत आहे. चार दिवस पावसाचा जोर होता. मात्र, आज सकाळी आणि सायंकाळी पावसाने उसंत दिल्याने या काळात खरेदीला पापाची तिकटी, राजारामपुरी आदी परिसरात गर्दी झाली. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक उपायांसह खरेदीवर भर दिला जात आहे. 
मास्क आणि सॅनिटायझरचा वापर केला जातो आहे. दरम्यान, यंदाही चायना वस्तूंना फाटा दिला गेला आहे. कापडी सजावटीवर अनेकांनी भर दिला आहे. 
बाजारपेठेत विविध आकारातील मखर, कापडी तयार मंदिरे, विविधरंगी फुलांच्या माळा, विविध आकारातील तयार प्रभावळींसह विविधरंगी कागद आणि विविधरंगी कापडांच्या असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत. लोखंडी पाईपपासून विविध आकारात तयार केलेली मंदिरेही यंदा अनेक ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असून आठशे रूपयांपासून पुढे त्याच्या किंमती आहेत. पर्यावरणपूरक सजावटीवर काही वर्षात वाढलेला कल लक्षात घेता कापडी व कागदी सजावटीच्या साहित्याची उपलब्धता विक्रेत्यांनी केली आहे. 

मुखवटे, तयार स्टॅंड 
गौरी व शंकरोबाच्या मुखवट्यांसह तयार स्टॅंडही बाजारात उपलब्ध असून पापाची तिकटी कुंभार गल्ली परिसरात विक्रेत्यांनी स्टॉल उभारले आहेत. विविध रूपांतील गौरी व शंकरोबाचे मुखवटे येथे उपलब्ध असून गणपतीची प्रभावळ व सजावटीचे काही साहित्य कायमस्वरूपी वापरण्याच्या उद्देशाने आता फायबरमध्येही उपलब्ध आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Lockdown: आज रात्रीपासून पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन! पंतप्रधान शहबाज शरीफ यांची घोषणा

IIT Baba Abhay Singh Story: आयआयटी बाबा अभय सिंहची पत्नी प्रितीका कोण?; ‘युनिव्हर्सिटी’ काढण्याचे स्वप्न, दोघांची भेट पवित्र ठिकाणी

Sinhgad Road News : अंतीम प्रवासावर अंधाराची छाया! वडगावात दुचाकीच्या उजेडात पार पडले अंत्यसंस्कार; मृत्यूनंतरही असुविधांची साथ, नागरिकांचा संताप

MI vs RR Live : मुंबई इंडियन्स-राजस्थान रॉयल्स सामना होण्याची शक्यता कमी, थेट गुवाहाटीवरून अपडेट्स, मॅच रद्द झाल्यास काय?

Nashik SIT Press: रुपाली चाकणकरांची चौकशी का नाही? नाशिकमध्ये एसआयटीची पत्रकार परिषद; तेजस्वी सातपुतेंचं स्पष्ट शब्दांत उत्तर

SCROLL FOR NEXT