Ganeshotsav will not be celebrated in kolhapur navepargon village 
कोल्हापूर

कोल्हापुरातील 'या' गावात साजरा होणार नाही गणेशोत्सव

संजय पाटील

घुणकी : हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव येथे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.  ग्रामपंचायत सदस्य, कोरोना दक्षता समिती, गावातील सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती लोकनियुक्त सरपंच प्रकाश देशमुख यांनी दिली.
 

महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम जोरात असते. मार्च पासून कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे यावेळचा गणेशोत्सव साजरा कसा करायचा हा प्रश्न सध्या सर्वत्र सुरु आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांतही संभ्रमावस्था असताना नवे पारगावात मात्र गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवे पारगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात गणेशोत्सव साजरा करण्याबाबत ग्रामपंचायत सदस्य, कोरोना दक्षता समिती, गावातील सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक लोकनियुक्त सरपंच प्रकाश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय झाल्याची माहिती सरपंच श्री. देशमुख यांनी दिली.
 

याबाबत देशमुख यांनी दिलेली माहिती अशी, शासन स्तरावर करण्यात येणाऱ्या उपाययोजांबरोबरच गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ते सर्व करण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करीत आहे. आज ग्रामपंचायतीच्या सभागृहात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्य, कोरोना दक्षता समिती, गावातील सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक उत्साहात पार पडली. दरवर्षी गावामध्ये मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. पण यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा न करण्याचा निर्णय झाला. यामुळे गावात कोणतेही मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणार नसल्याचेही सरपंच श्री. देशमुख यांनी सांगितले.
 

या बैठकीस उपसरपंच शुभदा पाटील,  सदस्य, वारणा दूध संघाचे संचालक प्रदिप देशमुख, माजी सरपंच नामदेव नेर्लेकर, ग्रामविकास अधिकारी अंकूश गोरे, मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

गावाच्या हिताच्या दृष्टीने व कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय अतिशय महत्वाचा होता. यासाठी सर्व मंडळांनी या संकल्पनेला दिलेल्या सक्रिय पाठिंब्याबद्दल ‌धन्यवाद.

-प्रकाश देशमुख, लोक, नियुक्त सरपंच, नवे पारगाव

संपादन धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT