Ganeshwadi farmer Praveen Borgave success story shirol kolhapur 
कोल्हापूर

वीस गुंठयात झाला तो लखपती ; घेतले विक्रमी उत्पादन

जितेंद्र आणुजे

नूसिहवाडी (कोल्हापूर) : गणेशवाडी ता. शिरोळ येथील प्रवीण बोरगावे या मेहनती जिद्दी अभ्यासू शेतकऱ्यांने कलर कॅप्सिकम म्हणजेच लाल - पिवळ्या रंगाच्या ढोबळी मिरची चे विक्रमी उत्पादन घेवून यशाचे रंग भरले आहेत. गेल्या वर्षी आलेला महापूर व सध्याच्या कोरोना च्या संकटाला न डगमगता वीस गुंठयात सतरा लाख रुपयांचा नफा मिळवला आहे.

    
गणेशवाडी तील प्रवीण बोरगावे  हे प्रयोगशील शेतकरी आहेत. रंगीत लाल-पिवळ्या ढोबळी मिरचीचे पॉलिहाऊसमध्ये सातत्याने उच्चांकी उत्पादन घेत आहेत. अवघ्या वीस गुंठ्यात त्यांनी सतरा लाख रुपयांचा नफा मिळवला. तीन महिन्यांनी तोडणी सुरू झाली सदर चा माल हैदराबाद मुुंबई पुुुणे नागपूर अशा मेट्रो सिटीत पाठवला जातो.   या सद्या  स्थितीला 180रूपये या दराने विकला जातो.    

                      
 आतापर्यंतया पॉलिहाऊसमधून 14टन माल निघाला आहे अजून 16 ते 20 टन ढबू निघेल सहा महिन्यांच्या कालावधीत सतरा लाख या पॉलिहाऊसमधून   उत्पादन मिळाला आहे. इथून पुढे निघणाऱ्या मालााासून 7 ते 8 लाख नफा अपेक्षित आहे .पॉलिहाऊस उभारणी, रोपे खते मजुरी, औषध फवारणी आदी सााठी तीन लाख रुपये खर्च आला आहे . दहा जणांचे बोरगावे कुटुंब दिवस रात्र  राबले जाते . मार्चपासून कोरोना ने थैमान घातल्यामुळे या रंगीत ढबु कडे इतर शेतकरी वर्ग फारसा वळला नसल्यामुळे प्रवीण यांच्या ढबुला चांगला दर मिळाला आहे या मंदीचे त्यांनी सोने केले आहे.

 बाजारात उत्पादित मालाला दर किती मिळतो हे न पाहता आपल्या शेतीमधून उत्पादन जास्तीत जास्त  उत्पादन घेणे हेच आजच्या घडीचे शहाणपण आहे. ऊस केळी या नगदी पीकासोबतच  इतर  पर्याय म्हणून पॉलिहाऊस मधून उत्पादन चांगले मिळू शकते
                        
संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : भविष्यात पोलिसांसाठी चांगल्या घरांची निर्मिती करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मोहोळ पोलिस ठाण्याच्या इमारतीचे उद्घाटन

Latest Marathi News Live Update : नागपूर रेल्वे स्टेशनवर माफिया आणि कुख्यात हिस्ट्रीशीटरांचे वर्चस्व; शिवसेनेकडून गंभीर आरोप

Donald Trump: ब्रिक्स देश डॉलरविरोधी; डोनाल्ड ट्रम्प यांची टीका, आयातशुल्काची पुन्हा धमकी

'या' कारणामुळे झालेला संजीव कुमार यांचा मृत्यू; अभिनेत्याने सांगितलं कारण, म्हणाला, 'रात्री २ वाजेपर्यंत खायचे आणि हाडं...

Smart Electricity Meter: मोबाईल स्मार्ट झाले, मग वीज मीटर स्मार्ट का नको? उच्च न्यायालयाचा याचिकाकर्त्याला प्रश्‍न

SCROLL FOR NEXT