Garbage dumped on road instead of Murma 
कोल्हापूर

इचलकरंजीत रस्त्यावर मुरमाऐवजी टाकला कचरा 

सकाळवृत्तसेवा

इचलकरंजी : पी. बा. पाटील मळा येथील वारंवार आंदोलने व मागणीनंतरही रस्त्याच्या कामात मुरमाऐवजी बायोमायनिंग कचरा टाकल्याने या भागातील संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला. दोन दिवसांपूर्वी पालिकेने मुरूम टाकण्याचे आश्‍वासन देऊनही रस्ता कामात कचऱ्याचा वापर केल्याने नागरिक चांगलेच संतापले. पालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कचरा बाहेर काढून मुरूम टाकण्याचा विश्‍वास दिल्यानंतर नागरिकांनी रस्ता रोको मागे घेतला. 

गेली आठ महिने झाले पी. बा. पाटील मळा येथे ड्रेनेजचे काम सुरू होते. हे काम झाल्यानंतर पालिकेने रस्त्याचे काम संथगतीने सुरू केले. पावसाळा सुरू झाला असून, या ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्णच राहिले. सध्या या भागात नियमित पावसामुळे चिखल मोठ्या प्रमाणात साठला आहे. त्यामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडणे मुश्‍कील झाले आहे. त्यात आता पालिकेने रस्त्याच्या कामात मुरमाऐवजी कचरा टाकल्याने नागरिक संतापले. कचऱ्यामुळे या भागात दुर्गंधी पसरत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. 

पावसाळ्याच्या दिवसातही पी. बा. पाटील मळ्यातील अंतर्गत रस्ते व मुख्य रस्त्याचे काम अर्धवट राहिल्याने नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला. शुक्रवारी सकाळी नागरिकांचे रौद्र रूप दिसून आले. आमराई रोडमार्गे टाकवडेकडे जाणाऱ्या रस्त्यावर नागरिकांनी रस्ता रोको केला. काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प राहिली. येथे पालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी हजर झाले. नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्वरित रस्त्याच्या कामात टाकलेल्या कचऱ्याची उचल करून मुरूम टाकण्याचे आश्‍वासन अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर नागरिकांनी रास्ता रोको मागे घेतला. 

कचरा टाकल्याने घाणीचे साम्राज्य 
रस्त्याच्या कामात मुरमाऐवजी बायोमायनिंग कचरा टाकला. या कचऱ्याचे विघटनच न झाल्याने पावसामुळे कचरा कुजत असून, या भागात दुर्गंधी पसरत आहे. पावसामुळे प्रचंड घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, कचऱ्यात अळ्या निर्माण होण्याची शक्‍यता आहे. या घाणीतूनच लोकांना ये-जा करावी लागत आहे. 

दृष्टिक्षेप 
- पावसाळा सुरू झाल्याने रस्त्याचे काम अपूर्ण 
- कचऱ्यामुळे या भागात दुर्गंधी 
- इचलकरंजीत संतप्त नागरिकांनी रास्ता रोको 
- मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Private Bus Ticket : चाकरमान्यांच्या परतीचा प्रवास महागला! कोल्हापूर ते मुंबई तिकीट दर पोहोचला 2700 रुपयांवर...; खासगी आराम बसेसचे बुकिंग हाऊसफुल्ल

Thane News: ठाण्यात दणदणाट! विसर्जन मिरवणुकांचा आवाज १०५ डेसिबलवर, ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Sudan Gold Mine Collapse : सोन्याची खाण कोसळली; ११ कामगारांचा मृत्यू, ३० जखमी, आठवडाभरात दुसरी दुर्घटना

Marathi News Live Updates : टिटवाळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत राडा; ७० ते ८० जणांविरोधात गुन्हा

विलासराव देशमुखांसमोर जिनिलियाने केलं असं काही, रितेशलाच बसला धक्का; म्हणाला, “मी दचकलो…”

SCROLL FOR NEXT