Gatari celebration on Sunday 
कोल्हापूर

रविवार साधून गटारी साजरी 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  :  आषाढाची सांगता उद्या (सोमवारी) होणार असली तरी रविवारचा मुहूर्त आणि लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर आजच शहरवासियांनी मांसाहारावर ताव मारला. सकाळपासूनच मटण आणि चिकन दुकानांत गर्दीच्या रांगा लागल्या. हॉटेलमधून पार्सल नेण्यावरही अनेकांनी भर दिला. 


आषाढ महिना, मांसाहार आणि कोल्हापूर हे एक अतूट समीकरणच. त्र्यंबोली यात्रा, परडी जत्रा असोत किंवा शेवटच्या आषाढी आमावस्येच्या निमित्ताने मांसाहारावर भर दिला जातो. आमावस्या उद्या असली तरी सोमवार आणि लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार बंद राहणार असल्याने हे सेलीब्रेशन आजच सर्वत्र साजरे झाले. दरम्यान, आषाढी आमावस्या ही दीप आमावस्या म्हणून साजरी करावी. दीवे अंधार दूर करून प्रकाश देतात. दिव्यांप्रती कृतज्ञता म्हणून ही आमावस्या दीप आमावस्या म्हणून साजरी करावी, असे आवाहन सोशल मीडियावरून होवू लागले आहे. 

अंड्यांना मागणी 
सलग सात दिवस लॉकडाऊन असल्याने अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. त्यामुळे अंडी खरेदीसाठीही आज मोठी गर्दी झाली. किमान आठवडाभर पुरतील इतकी अंडी खरेदी करण्यावर बहुतांश जणांनी भर दिला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Natural Reservoir Bursts : ‘बिकट परिस्थितीतून नेपाळी सैन्याने वाचविले’; नेपाळी सैन्याच्या मदतीची नागरिकांनी केली प्रशंसा

Nasrapur Crime : सारोळा गावात थरार! पत्नीच्या प्रियकराचा चाकूने भोसकून खून; आरोपी पतीला अटक

Nepal Natural Reservoir Bursts : नेपाळने नाकारली बचाव पथकांची मदत; नेपाळी सुरक्षा पथकांकडून शोध सुरूच

Truck Bike Accident : रक्षाबंधनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला! ट्रक-दुचाकीच्या अपघातात वडील-मुलीचा मृत्यू; आई गंभीर

Nepal Natural Reservoir Bursts : नेपाळमध्ये जलप्रलय! नैसर्गिक जलाशय फुटला; नेपाळ-चीन सीमेवरील भागांना पुन्हा पुराचा धोका

SCROLL FOR NEXT