geampanchayt election reselt political marathi news kolhapur 
कोल्हापूर

सत्तेच्या सारीपाटासाठी कट्टर विरोधक आले एकत्र

सकाळ वृत्तसेवा

म्हाकवे (कोल्हापूर)  : राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बेलवळे खुर्द (ता. कागल) येथे ग्रामपंचायत सत्तेसाठी हाडवैर बाजूला ठेवून कट्टर विरोधक एकत्र आले. याची जोरदार चर्चा कागल तालुक्‍यात सुरू आहे.


ग्रामपंचायतीच्या राजकारणातून येथील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ गटाच्या दिनकर कोतेकर समर्थक प्रवीण डोंगळे व प्रकाश पाटील (कोतेकर) यांच्यावर आठ वर्षांपूर्वी गोळ्या झाडल्या होत्या. त्यामध्ये दोघांना जीव गमवावा लागला होता.

दोघांच्या खुनाच्या आरोपातून सध्या जामिनावर असलेल्या माणकू पाटील गट व कोतेकर गट यांनी आज सरपंच निवडीवेळी युती केली. हे दोन्ही गट संयुक्तपणे सत्तेवर आले. मुश्रीफ समर्थक कोतेकर गटाच्या रेश्‍मा शहाजी पाटील यांची सरपंचपदी तर भाजपचे जिल्हाध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे समर्थक माणकू पाटील गटाच्या धनाजी ज्ञानदेव कांबळे यांची उपसरपंचपदी निवड झाली. विशेष म्हणजे हे दोन्ही गट परस्परविरोधात लढले होते.

मंडलिक-मुश्रीफ युतीने सहा जागा जिंकून सत्ता मिळवली होती. मंडलिक-मुश्रीफ गटाला तीन, तीन जागा मिळाल्या होत्या. तर विरोधी समरजितसिंह घाटगे, संजय घाटगे, शिवसेनेचे अशोक पाटील, रणजितसिंह पाटील तसेच बाबासाहेब पाटील यांच्या आघाडीला तीन जागेवर समाधान मानावे लागले होते; मात्र बहुमत असलेल्या मुश्रीफ व मंडलिक गट यांच्यात सरपंचपदावरून झालेल्या रस्सीखेचातून तोडगा न निघाल्याने कोतेकर यांनी मंडलिक गटाला सत्तेतून बाजूला करीत राजे गटाशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

SCROLL FOR NEXT