gelatin bomb material found in kurundwad kolhapur  
कोल्हापूर

शिवसेनेच्या तालुकाप्रमुखाच्या नावे बॉम्बसदृश्य पार्सल; बॉक्स उघडताच सोडला सुटकेचा निश्वास

सकाळ वृत्तसेवा

कुरुंदवाड (कोल्हापूर) : शिवसेनेचे शिरोळ तालुकाप्रमुख वैभव उगळे यांच्या नावे काल सायंकाळी आलेल्या पार्सलमध्ये बॉम्बसदृश साहित्य आढळल्याने एकच खळबळ उडाली. पोलिस व प्रशासनाची धावपळ उडाली. पोलिसांनी पार्सल तबक उद्यानातील खुल्या जागेत ठेवले व कोल्हापुरातून बॉम्बशोध पथक बोलाविले. रात्री पथकाच्या पडताळणीत पार्सलमध्ये साधे घड्याळ, काही वायरींचे सर्किट व फटाक्‍यांची दारू आढळली. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. 

सायंकाळी उगळे यांच्या नावे पार्सल व फुलांचा बुके घेऊन एक वृद्ध व्यक्ती सांगलीहून रिक्षातून कुरुंदवाडला आली. पार्सलवर ‘विजय भुवन (हॉटेल) भालचंद्र थिएटर’ असा पत्ता होता. हॉटेल मालकाने बॉक्‍स पाहून उगळे यांना कल्पना दिली. उगळेंनी त्या व्यक्तीस थांबवून ठेवत पोलिसांना कळविले. पोलिस निरीक्षक चंद्रकांत निरावडे फौजफाट्यासह आले. त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. पोलिसांनी पार्सल तबक उद्यानातील मैदानात ठेवले. तोपर्यंत ही बातमी पसरली व मोठा जमाव गोळा झाला. 

इचलकरंजी विभागीय पोलिस अधिकारी बाबूराव महामुनी घटनास्थळी आले. रात्री कोल्हापूरहून बॉम्बशोध पथक आले. त्यातील मानसिंग पाटील, विनायक लाड, आशिष मिठारे, रवींद्र पाटील, ओंकार पाटील, जयंत पाटील, विनायक डोंगरे, मुस्ताक शेख यांनी सामग्री लावून वस्तूंची पाहणी केली. त्या निकामी केल्या. हे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले. पार्सल घेऊन आलेल्या व्यक्तीची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT