ghazalkar ilahi jamadar pass away 
कोल्हापूर

सुप्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा

सांगली : सुप्रसिद्ध गझलकार इलाही जमादार (वय ७५) यांचे नकतेच निधन झाले. सांगली जिल्ह्यातील दूधगावात हे त्यांचे मुळ गाव असून त्याच गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून जमादार आजाराने त्रस्त होते.  

सांगली जिल्ह्यातील वारणा काठावरील दुधगाव गावात एक मार्च 1946 रोजी त्यांचा जन्म झाला. 1964 पासून त्यांनी काव्य लेखनास प्रारंभ केला. पुणे येथे ते स्थायिक झाले होते. आकाशवाणी, दूरदर्शनचे ते मान्यताप्राप्त कवी
होते. त्यांच्या कविता आणि गझला राज्यातच नव्हेतर राज्याबाहेरही प्रसिद्ध आहेत. "जखमा अशा सुगंधी' आणि "महफील ए इलाही' या नावाचे मराठी व उर्दू
काव्यवाचनाचे कार्यक्रम सर्वत्र प्रसिद्ध झाले होते. गतवर्षी ते घरात
किरकोळ अपघात होऊन जखमी झाले होते. त्यांना स्मृतिभ्रंशही जडला होता. आज सकाळी त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच कवी, साहित्यिक आदींना धक्काच बसला. सोशल मिडियावर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

नाव गाव माझे बदलून पाहिले मी...अन मुखवटे हजारो चढवून पाहिले...मी काय काय केले, सांगु किती कुणाला...तळहात आज दोन्ही उसवून पाहिले मी' अशा प्रकारच्या अनेक गझला अजरामर करणारे इलाही जमादार हे उत्तुंग गझलकार म्हणून ओळखले जातात. सुरेश भटांच्यानंतर अलिकडच्या काळात गझलकार म्हणून त्यांचेच नाव घेतले जात होते.

इलाही जमादार यांची गीते
मराठी - एक जखम सुगंधी, शब्दसुरांची भावयात्रा, स्वप्न तारकांचे, भावनांची वादळे (गझला व निवेदन) तसेच हिंदी अलबम -हिंदी पॉप गीते प्रसिद्ध आहेत. 
संगीतिका - हिंदी - सप्तस्वर, माया और साया, नीर क्षीर विवेक. मराठी - स्वप्न मिनीचे
नृत्यनाट्ये : हिंदी - नीरक्षीरविवेक
मराठी - मी कळी मला फुलायचे.  जखमा अशा सुगंधी , भावनांची वादळे , दोहे इलाहीचे, मुक्तक आदी इलाही जमादार यांचे काव्य/गझल संग्रह.... अनुराग, अनुष्का, अभिसारिका, गुफगू आणि मुक्तक .
 
संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PETA India On Mahadevi Elephant : 'महादेवी'वर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही ठिकाण नाही; पेटा इंडियाचा नवा लेटर बॉम्ब, 'घरवापसीत' अडथळा?

Sharanu Hande: कोण आहे शरणु हांडे? 2021 मध्ये काय घडलं होतं? अमित सुरवसेने बदला का घेतला? जाणून घ्या...

Virat Kohli: किंग कोहली वन डेतून निवृत्ती घेतोय...! लंडनमधील 'त्या' फोटोमुळे चाहत्यांची वाढली चिंता; एक जण म्हणाला, हे खूप वेदनादायी

Raksha Bandhan 2025: यंदा भावापासून दूर असाल तर 'या' 5 पद्धतीने रक्षाबंधन बनवा अविस्मरणीय

Narali Pournima And Raksha Bandhan: आज नारळी पौर्णिमा आणि उद्या रक्षाबंधन; जाणून घ्या दुहेरी सणांचा शुभ योग

SCROLL FOR NEXT