Kolhapuri Chappal esakal
कोल्हापूर

Kolhapuri Chappal: विषयच हार्ड! कोल्हापुरी चप्पल बनविणाऱ्या 32 कारागिरांना GI प्रमाणपत्र; राष्ट्रीय स्तरावर मान्यता

GI for Kolhapuri Chappal: कोल्हापुरी चप्पलला राष्ट्रीय स्तरावर हस्तकलेचा उत्तम वारसा म्हणून मान्यता मिळाली आहे.

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापुरी चप्पलसाठी कोल्हापूरसह बेळगाव, विजापूर, बागलकोट, धारवाड, सांगली, सातारा या जिल्ह्यांची भौगोलिक स्थाननिश्चिती करण्यात आली आहे.

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या (Central Government) विकास आयुक्त (हस्तकला) यांच्या कार्यालयातर्फे जिल्ह्यातील ३२ कारागिरांना जीआय प्रमाणपत्र (GI certificate) मिळाले आहे. हे सर्व कारागीर कोल्हापुरी चप्पल घडविणारे आहेत.

भौगोलिक स्थान निश्चितीच्या निकषानुसार कोल्हापुरी चप्पल (Kolhapuri Chappal) बनविणारे शासनाने अधिकृत केलेले कारागीर म्हणून या ३२ जणांची नोंद झाली आहे.

कोल्हापुरी चप्पलला राष्ट्रीय स्तरावर हस्तकलेचा उत्तम वारसा म्हणून मान्यता मिळाली आहे. चप्पलला जीआय मानांकन (भौगोलिक स्थाननिश्चिती) मिळाले आहे. या मानांकनाप्रमाणे चप्पल बनवणारे कारागीर आहेत; पण त्यांची स्वतंत्र ओळख नाही.

यासाठी केंद्र सरकारच्या हस्तकला विभागाने या कारागिरांना जी.आय. प्रमाणपत्र देण्याचे निश्चित केले. याची एक प्रक्रियाही निश्चित केली. याअंतर्गत कारागीर हस्तकला विभागाकडे अर्ज करतात.

अर्जाची छाननी होऊन सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर हे प्रस्ताव चेन्नई येथील भौगोलिक उपदर्शन रजिस्ट्रीकडे पाठवले जातात. येथे प्रस्तावांची पाहणी, प्रत्यक्ष चप्पलची पाहणी केल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते. यामुळे कोल्हापुरातील कारागिरांच्या कलेला शासनाची अधिकृत मान्यता मिळाली आहे.

हे आहेत फायदे

  • जी.आय. मानांकनाप्रमाणे चप्पल बनवणारे अधिकृत कारागीर

  • भौगोलिक स्थान निश्चित केलेले क्षेत्र सोडून अन्यत्र चप्पल बनवल्यास तक्रार करण्याचा अधिकार

  • कोल्हापुरी चप्पल निर्यात करण्यासाठी जी.आय.प्रमाणपत्र उपयोगी

  • देशाच्या अन्य भागांत शासकीय हस्तकला प्रदर्शनांमध्ये प्राधान्य

‘केंद्र सरकारच्या विकास आयुक्त कार्यालय (हस्तकला) यांच्या माध्यमातून कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांना हे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच कारागिरांना असे प्रमाणपत्र मिळाले असून, त्यामुळे आता त्यांच्या कलेवर शासनाची मोहर उमटली आहे.’

- चंद्रशेखर सिंग, वरिष्ठ सहायक संचालक, हस्तकला विभाग

कारागिरांना स्वतंत्र ओळखपत्र

केंद्र सरकारच्या हस्तकला विभागाने कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांची नोंदणी केली असून, त्यांना ओळखपत्र दिले आहे. भौगोलिक स्थान निश्चिती केलेल्या जिल्ह्यांतील पाच हजार कारागिरांना हे ओळखपत्र देण्यात आले आहे..

...तरीही जिल्हा मागे

कोल्हापुरी चप्पलसाठी कोल्हापूरसह बेळगाव, विजापूर, बागलकोट, धारवाड, सांगली, सातारा या जिल्ह्यांची भौगोलिक स्थाननिश्चिती करण्यात आली आहे. या सर्व जिल्ह्यांत मिळून सुमारे २० हजार कारागीर आहेत.

कर्नाटक सरकारने आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त कारागिरांना जीआय प्रमाणपत्र मिळवून दिले. कोल्हापुरात मात्र पहिल्यांदाच हे प्रमाणपत्र कारागिरांना मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT