girl frustrated because she cannot go to the village to visit her mother 
कोल्हापूर

हृदयद्रावक : 'ती' म्हणायची मला आईला भेटायचंय पण लाकडाऊनमुळे भेट झाली नाही अन् तिने उचलले 'हे' पाऊल....

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - लाकडाऊनमुळे आईची भेट होत नाही. तिच्या भेटीसाठी गावी जाता येत नसल्याच्या नैराश्‍येतून आज युवतीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. पाचगाव (ता. करवीर) येथे आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. प्रेरणा कुंतीनाथ कल्याणकर (वय 17, मूळ रा. अकोळ, ता. चिकोडी, बेळगाव, सध्या रा. पाचगाव) असे त्या युवतीचे नाव आहे. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.

गेल्या दोन दिवसापासून ती होती नाराज

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, प्रेरणा व तिची आई मनिषा या आकोळ, ता. चिकोडी (बेळगाव) येथे राहतात. पण गेल्या दोन वर्षापासून पाचगाव येथील आजोळी राहात आहेत. प्रेरणाची आई सहा महिन्यापासून आकोळ गावी गेल्या आहेत. आईची दिर्घकाळ भेट न झाल्याने ती तिला भेटण्यासाठी आजोबा दिनकर जोगदंडे यांच्याकडे हट्टाहास सुरू केला होता. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने तिला आईच्या भेटीसाठी आजोबांना पाठविता आले नाही. ती ऐकण्याच्या स्थितीत नव्हती. गेल्या दोन दिवसापासून ती नाराज होती. शुक्रवारी रात्री जेवण करून ती आपल्या बेडरूमध्ये झोपण्यास निघून गेली. तिने घरातील बेडरूममधील स्लॅबच्या हुकाला नॉयलॉन दोरी व ओढीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ती खोलीबाहेर न आल्याने तिच्या आजोबांनी तिला आवाज दिला. पण प्रतिउत्तर न आल्याने त्यांनी दरवाजा उघडून आत पाहील्यानंतर त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी याची माहिती करवीर पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण कर्मचारी आर.एन. बरगे व सुनील देसाई यांनी भेट दिली. त्यांनी पचनामा करून उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

पाचगाव परिसरात हळहळ

लॉकडाऊनमुळे सीमा भागात असणाऱ्या गावी जाऊन आईची भेट घेता येत नसल्याच्या नैराश्‍येतून युवतीने थेट आत्महत्येपर्यंत घेतलेल्या निर्णयाने पाचगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT