Give the benefit of Mahatma Jotirao Phule Janaarogya Yojana to Corona patients 
कोल्हापूर

महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ कोरोना रुग्णांना द्या

सुनील पाटील

कोल्हापूर : महात्मा जोतिराव फुले जन-आरोग्य योजनेत समावेश असलेल्या रुग्णालयांनी कोरोना रुग्णांना तात्काळ दाखल करुन घ्यावे. कोरोना रुग्णांनाही या योजनेचा लाभ दिला पाहिजे. कोरोना रुग्ण दाखल करुन घेण्यास किंवा त्यांच्यावर उपचार करण्यास हलगर्जीपणा करु नये. साथ रोगामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा खासगी रुग्णालयांनी अवास्तव बिले आकारल्यास त्याची लेखा पडताळणी करुन, अशा रुग्णालयांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. प्रसंगी या रुग्णालयांना योजनेतून काढून टाकण्यात येईल. याशिवाय, नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिला. 
महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत सहभागी असलेल्या कोल्हापूर शहरातील रुग्णालयांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. 
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, "" खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड आरक्षित केले आहेत. अशी रुग्णालये महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ठ असोत अगर नसोत. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णास प्रथम उपचार करण्यास रुग्णालयांनी प्राधान्य दिले पाहिजे.'' 
आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, ""खासगी रुग्णालयातील बेड उपलब्धता आणि बील तपासणीसाठी महापालिकेमार्फत अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा जादा दराने बील आकरणी केल्याचे निदर्शनास आल्यास अशा रुग्णालयांचे परवाने रद्द केले जातील.'' खासगी रुग्णालयांनी रुग्णालयामार्फतच जेवण द्यावे, अशी सूचनाही डॉ. कलशेट्टी यांनी केली. 
संजय पवार म्हणाले, "" खासगी रुग्णालयाकडून अवास्तव बिल आकारणी केली जाते. स्वत:च्याच दवाखान्यात डॉक्‍टर रुग्णांना व्हिझिट दिली म्हणून हजारो रुपयांचे शुल्क घेतात. नर्सिंग चार्ज वेगळा लावलात हे कमी झाले पाहिजे. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेतील रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार व्हावेत तसेच खासगी रुग्णालयाकडून अवाजवी बील आकारु नये याबाबत प्रशासनाने संबंधितांना सूचना कराव्यात,.'' असे आवाहनही श्री. पवार यांनी केले. 
यावेळी, विजय देवणे, महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश असलेल्या शहरातील खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 
 -संपादन - यशवंत केसरकर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra kerosene Supply: राज्य सरकारचा रॉकेल पुरवठ्याचा निर्णय; वितरण करणारी व्यवस्था नामशेष, रॉकेल येणार पण स्टोव्हच सापडेना!

Latest Marathi News Live Update : विठ्ठल-रुक्मिणी पूजेची बुधवारपासून ऑनलाईन नोंदणी

Ashok Kharat Case Update : पीडित महिला आमदाराला भेटली, व्हिडिओही दाखवले, पण त्याने.... अशोक खरात प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा !

Chhatrapati Sambhajinagar: अकरावीसाठी कागदपत्रे तयार ठेवा; ऑनलाइन प्रक्रियेत विलंब टाळण्यासाठी शिक्षण विभागाचे आवाहन

Sangamner fuel Shortage: संगमनेरमध्ये इंधन भरण्यासाठी दुचाकींच्या रांगा; दर वाढण्याची भीती? अनेक पंपांचा साठा संपला!

SCROLL FOR NEXT