OBC vs Maratha Reservation esakal
कोल्हापूर

Maratha Reservation : 'मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, OBC आरक्षणातील घुसखोरी आम्ही कदापि सहन करणार नाही'

मराठा समाजाला (Maratha Community) स्वतंत्र आरक्षण द्या.

सकाळ डिजिटल टीम

ओबीसी समाज सत्ताधाऱ्यांना आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

कोल्हापूर : ‘ओबीसी आरक्षणातील (OBC Reservation) घुसखोरी आम्ही कदापि सहन करणार नाही. मराठा समाजाला (Maratha Community) स्वतंत्र आरक्षण द्या. लोकसंख्येच्या प्रमाणात सत्ता, साधन संपत्तीचे समान वाटप करण्यासाठी जातवार जनगणना झालीच पाहिजे’, अशी मागणी ओबीसी जनमोर्चा कोल्हापूरचे नेते नंदकुमार वळंजू, मारूतराव कातवरे, सरचिटणीस सयाजी झुंजार आणि दिगंबर लोहार यांनी पत्रकार परिषदेत केली.

मराठा समाजाची ओबीसीमधून आरक्षण, कुणबी जातीचा दाखला मिळावा, अशी मागणी आहे. या मागणीचे राज्य सरकारने समर्थन करून समिती गठीत केली आहे. मराठा समाजाला कुणबी समाजाचे दाखले देवून ओबीसी आरक्षणात घुसवायची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्याच्या विरोधात ओबीसी संघटना (OBC Association) एकत्र झाल्या आहे.

आधीच ५२ टक्के ओबीसी लोकसंख्येला फक्त २७ टक्के एवढे तुटपुंजे आरक्षण असताना यामध्ये सर्व ओबीसी जातींना पुरेसा लाभ मिळत नाही. त्या ओबीसी आरक्षणात सर्व सत्ता हातात असलेल्या मराठा समाजाचा समावेश करणे म्हणजे ओबीसी समाजाला समानतेचा हक्क नाकारणे आहे.

जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी – कुणबी समाजाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. राज्यातील सर्व तहसील कचेरीवर निदर्शने करून निवेदन देऊन जिल्हाभर आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. ओबीसीमध्ये समाविष्ट असलेल्या संघटनांच्या अध्यक्ष, नेते, महिला मंडळांच्या पदाधिकारी, आदींची कोल्हापुरात व्यापक बैठक घेणार असल्याचे वळंजू आणि कातवरे यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला सुरेश कोरगांवकर, अॅड. किशोर नाझरे, बाबासाहेब काशिद, विजय घारे, सुनील गाताडे, मोहन हजारे, रफीक शेख, दिलीप गवळी, युवराज गवळी, विलास लोहार, चंद्रकांत कोवळे, बाबूराव बोडके, महादेव डमाकले, सुनिल वडगावकर, शिवाजी माळकर, अनिल पांचाळ आदी उपस्थित होते.

लाठीहल्ल्याचा निषेध

शासनाने मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्याचा प्रयत्न केल्यास जिल्ह्यातील ओबीसी समाज सत्ताधाऱ्यांना आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी दिगंबर लोहार आणि सयाजी झुंजार यांनी दिला. मराठा आंदोलकांवर जालना येथे झालेल्या लाठीहल्ल्याचा ओबीसी जनमोर्चा निषेध करत असल्याचे झुंजार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna News: महाशिवरात्र व हरिनाम सप्ताह सुरू असताना बाेकड कापल; जालना जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार, ग्रामस्थांचा रस्त्यावर ठिय्या!

Kolhapur Muncipal : पाच वर्षांत १२ स्वीकृत नगरसेवक; कोल्हापूर महापालिकेत भाजपची नवी राजकीय रणनीती

Magh Mela 2026: कुंभमेळ्याचा रेकॉर्ड मोडला! प्रयागराजमध्ये २२ कोटी भाविकांनी मारली डुबकी; ४४ दिवसांच्या माघ मेळ्याची सांगता

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

SCROLL FOR NEXT