Give the woman a chance, she will prove her duty 
कोल्हापूर

स्त्रीला संधी द्या, ती कर्तृत्व सिद्ध करेल 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : घरात असो वा समाजात विविध पातळ्यांवर अन्यायाला, संकटाला सामोरे जाण्याची वेळ अनेक महिलांवर येते. महिलांचे खच्चीकरण होते. आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्याला खीळ बसते. असे अनेक घटनांतून दिसून येत आहे. अशा स्थितीत महिलांविषयी आदराची भावना सर्वच पातळ्यांवर जागरूक होणे आवश्‍यक आहे. त्याचाच भाग म्हणून शालेय स्तरापासून ते समाजघटकांपर्यंत स्त्रियांविषयी आदर सन्मान बाळगण्याची शिकवण अधिक प्रभावीपणे देणे आवश्‍यक आहे. तिला संधी द्या, ती तिचे कर्तृत्व सिद्ध करेल, असा सुर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज "सकाळ' शी बोलताना व्यक्त केला. 

आपला समाज अनेक संकुचित विचारांनी ग्रासलेला आहे. हे संकुचित विचार सोडून देऊन महिला, मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. शाळा - महाविद्यालयातील संस्कार भवितव्यासाठी महत्वाचे ठरतात. याच ठिकाणी स्त्री सन्मान, आदराची भावना मुलांमध्ये तयार झाली तर महिलांच्या असुरक्षिततेचा मुद्दाच राहणार नाही. तिला स्वातंत्र्य, संधी दिली की ती तिचे कर्तृत्व सिद्ध करेलच. आपण सुरक्षित जगात वावरत आहोत, अशी भावना प्रत्येक महिला, मुलीला करून देण्याची जबाबदारी आपली आहे. 
- अनिल धडाम, अध्यक्ष, इलेक्‍ट्रॉनिक्‍स असोसिएशन (49045) 

दरवर्षी आपण महिला दिन साजरा करतो. त्यांना विविध क्षेत्रात 50 टक्के, 33 टक्के आरक्षण दिले आहे. त्यांना संधी दिली. मात्र कारभार मात्र तिच्या हातात नाही, हे वास्तव आहे. तिचे कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी तिला द्या, ती निश्‍चितच सक्षमपणे आपल्या सर्वच जबाबदाऱ्या पार पाडेल. पाश्‍चात्य संस्कृतीतील वेशभुषा आपल्या महिला, मुलींनी स्विकारली. यातून काही अनुचित घटना घडल्या. हे रोखायचे असेल तर पारंपारिक संस्कृतीतील वेशभुषाच महिलांनी वापरल्या पाहिजेत. पोलिस प्रत्येक ठिकाणी पोहचू शकत नाहीत. त्यामुळे प्रत्येक महिला, मुलीने स्वसंरक्षणाचे धडे घ्यावेत. 
- डॉ. शिरीष कुलकर्णी  

आपल्या मुलीकडे आपण ज्या नजरेने पाहतो. त्या नजरेने समाजात वावरणाऱ्या प्रत्येक मुलीकडे पाहिले पाहिजे. समाजातील प्रत्येक महिलेला घरची सदस्य म्हणून वागणूक दिली तर महिलांवरील अत्याचाराचे प्रसंग घडणारच नाहीत. प्रत्येक आई वडीलाने आपल्या मुलींचे मन आणि मनगट बळकट केले तर तिच्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमतही होणार नाही. 
- दिनानाथ सिंह, हिंदकेसरी 

भारतीय संस्कृतीत महिलांचा आदर करण्याचे संस्कार आहेत. इतिहासातील कर्तृत्ववान पुरूषांची नावे घेताना त्यांच्या आईच्या नावावरून सुरवात होते. महिला ही जगतजननी आहे. तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनही आदर, सन्मानाचा असला पाहिजे. तिचा जितका सन्मान होईल तितकी समाजाची ओळख चांगली बनेल. 
- ऍड. रणजित गावडे, अध्यक्ष, कोल्हापूर बार असोसिएशन 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस...सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT