Given two lakhs and the lender is asking for three and a half lakhs 
कोल्हापूर

दिले दोन लाख आणि सावकार मागतोय साडेतीन लाख

युवराज बोरगे

कळे (कोल्हापूर)  ः जास्तीत जास्त रक्कम मिळविण्याच्या हव्यासापोटी सावकाराने येथील एकास मारहाण केली. याबाबत कृष्णात वसंत वडाम (सावताची वाडी, ता. राधानगरी) व अमोल ऊर्फ बंडा चौगले (कोल्हापूर) या खासगी सावकारांविरोधात भिकाजी दिनकर पाटील (कळे, ता. पन्हाळा) याने कळे पोलिसांत फिर्याद दिली.

येथील एका संघाच्या पेट्रोल पंपावर भिकाजी दीनकर पाटील (कळे) व शिवाजी भिकाजी पाटील (गोगवे, ता. पन्हाळा) गतवर्षी एकत्र कामावर होते. उसनवार परत करण्यासाठी भिकाजीला पैशाची गरज होती. एप्रिलपासून वेळोवेळी त्याने शिवाजीचा नातेवाईक कृष्णात वडाम याच्याकडून सुरेश आनंदा लोंढे (कळे) याच्या मध्यस्थीने दहा टक्के व्याजाने दोन लाख वीस हजार रुपये घेतले. दरम्यान, भिकाजीने साठ हजार परतफेड केले. ठरलेल्या व्याजासह साडेतीन लाख रुपयांची मागणी वडामने केली. चर्चेसाठी भिकाजीने त्याला सोमवारी (ता. 13) दुपारच्या सुमारास कळे येथील एका शेती सेवा केंद्रात बोलावले. यावेळी पैशावरून दोघांत कडाक्‍याचे भांडण झाले. यावेळी कृष्णात वडाम याने भिकाजी पाटील यास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेला व त्याचा साथीदार अमोल ऊर्फ बंडा चौगले (कोल्हापूर) याने फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली. 
दरम्यान, कृष्णात वडामला कळे न्यायालयात हजर केले असता न्या. विनोद खुळपे यांनी शनिवार (ता.18) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल महेश घाटगे, नाईक गजानन गुरव, प्रमोद पाटील, सागर पाटील यांनी कारवाई केली. तपास हेडकॉन्स्टेबल महेश घाटगे करत आहेत. 

घराची झडती 
खासगी सावकार कृष्णात वडाम याला सावताची वाडी (ता. राधानगरी) येथील घरातून कळे पोलिसांनी ताब्यात घेतले असून, घराच्या घेतलेल्या झडतीत कोरे धनादेश व स्टॅम्पसह आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली.

संपादन - रंगराव हिर्डेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? मोठ्या पावसाचा इशारा नाही

भारताला LPG पुरवठा करणारा अमेरिका ठरला सर्वात मोठा देश; US अधिकारी म्हणाल्या, ‘एनर्जी सप्लायर बनल्याचा आनंद’

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

SCROLL FOR NEXT