Arun Dongle vs Shoumika Mahadik
Arun Dongle vs Shoumika Mahadik  esakal
कोल्हापूर

Gokul Dudh Sangh : धनंजय महाडिकांच्या सासऱ्याकडे आधी ठेका होता, त्यांनी एवढे दिवस काय केले? 'गोकुळ' अध्यक्ष डोंगळेंचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

बारामती, फलटण येथील दूध विक्रीचा ठेका पूर्वी धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचे सासरे श्री. निंबाळकर यांच्याकडे होता.

कोल्हापूर : बारामती, फलटण येथील दूध विक्रीचा ठेका पूर्वी धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचे सासरे श्री. निंबाळकर यांच्याकडे होता. तो ठेका आता संजय पाटील यांचे नातलग रणजित धुमाळ यांना दिला आहे, अशी माहिती अध्यक्ष अरुण डोंगळे (Arun Dongle) यांनी दिली.

धुमाळ यांच्याकडे ठेका दिल्यानंतर या परिसरातील दूध विक्री ४.४ टक्क्याने वाढली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे २७ वर्षे ठेका होता, त्या निंबाळकर यांनी एवढे दिवस काय केले? हा मोठा प्रश्‍न आहे. त्यामुळे ठेका कोणाच्या पाहुण्याला दिला हा विषय नाही, गोकुळला यातून चांगला फायदा झाला, हे आमच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे ही ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी स्पष्ट केले.

कागल येथील पंचतारांकित एमआयडीसी येथील महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना येथे झालेल्या वार्षिक सभेत (Gokul Dudh Sangh Sabha) ते बोलत होते. याबाबत संचालिका शौमिका महाडिक यांच्यासह विविध संस्थांनी विचारलेल्या प्रश्‍नांना त्यांनी उत्तरे दिली.

डोंगळे म्हणाले, ‘अन्न सुरक्षा कायद्यानुसार वासाचे दूध परत दिले जात नाही. यामध्ये विद्यमान संचालकांच्या संस्थेचेही दूध वासाचे म्हणून नाकारले आहे. दरम्यान, हे परत न दिल्या जाणाऱ्या दुधाला जास्तीतजास्त दर देण्याबाबत निश्चि‍तपणे विचार केला जाईल. संघाच्या खर्चात मोठी कपात झाली आहे. नोकर पगारामध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत ९ कोटी ५० लाख रुपये कमी झाले आहेत. अस्थायी खर्चामध्ये पॉलिथीन, फिल्म, पॅकिंग खर्च, वीज, पाणी व वाहतूक खर्चाचा समावेश असतो.

गोकुळच्या विविध पदार्थ, दूध विक्रीमध्ये वाढ झाल्याने अस्थायी खर्चात वाढ दिसत आहे. संचालकांच्या प्रशिक्षण खर्चात वाढ झाली आहे, हा महाडिक यांचा प्रश्‍न बरोबर आहे. मात्र, यावर्षी एनडीडीबीच्या प्रशिक्षणासह केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी अहमदाबाद (गांधीनगर) येथे घेतलेल्या प्रशिक्षणामुळे हा खर्च वाढला आहे. लम्पी आजारावरील लस शासनाकडे नसल्यामुळे संघाने स्वत: लस खरेदी केली. यातून १ लाख ८६ हजार २०० गाय व बैलवर्गीय जनावरांना लसीकरण करून या संसर्गाला अटकाव केला आहे.’

दूध संकलनाबाबत ते म्हणाले, ‘दुर्गम व डोंगराळ भागातील गावांमध्ये नवीन संस्थांचे दूध स्वीकृतीसाठी २.७५ टन क्षमतेची गाडी वापरणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे या रुटमध्ये फेरबदल करून त्या ठिकाणी १.५० टन क्षमतेचे दोन मार्ग करावे लागले आहेत. ३४ ठिकाणांवरील मार्गावर क्षमतेपेक्षा जादा कॅन व दूध झाल्यामुळे इतर काही भागामध्ये खासगी प्रकल्पांकडे जाणारे दूध गोकुळकडे घेण्यासाठी नवीन मार्ग सुरू करावे लागले आहेत. त्यामुळे संकलनात घट झाली आहे. तर, खर्चात वाढ झालेली दिसत आहे.’

वाढीव संस्थांना शासनाची मंजुरी

‘गोकुळ’मध्ये दूध संस्था वाढवल्या म्हणून शौमिका महाडिक सांगत आहेत. मात्र, ज्या दूध संस्था संघाने वाढवल्या आहेत, त्याला शासनाने मंजुरी दिली आहे आणि शासन तुमचेच आहे. याबाबत त्यांनी शासनाला विचारावे’, असा टोलाही डोंगळे यांनी लगावला.

शौमिका महाडिकांचे ‘अमूल’ वाढवण्यासाठी प्रयत्न

शौमिका महाडिक संचालकांच्या बैठकीला बऱ्याचवेळेला गैरहजर असतात. हजर असणाऱ्या सभेत त्या कधीही बोलत नाहीत किंवा त्यांचे प्रश्‍नही सांगत नाहीत. त्यामुळे कावीळ झालेल्यांना जसं पिवळं दिसतं तसंच त्यांना सगळं पिवळंच दिसायला लागले आहे. त्या गोकुळच्या संचालिका असल्या तरीही ‘अमूल’ वाढवायला हातभार लावत आहेत, असा आरोप डोंगळे यांनी केला.

सोशल मीडियावरील बनावट तक्रार

‘शौमिका महाडिक यांनी सोशल मीडियावरील एक तक्रार दाखवली. त्यांनी दाखवलेल्या तक्रारीनंतर आम्ही त्याची खात्री केली. पण ती तक्रार बनावट असल्याचे लक्षात आले. याची माहिती महाडिक यांनाही दिली. त्यानंतर त्यांनी ती मान्यही केली. महाडिक यांनी दाखवलेली ही तक्रार त्यांची काळजी म्हणू शकतो. पण तीच पोस्ट तुम्ही दहाजणांना पाठवली, तर त्याला आम्ही काय करु शकतो’, असा सवालही डोंगळे यांनी केला.

अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिलेली उत्तरे...

  • किकवी येथील दूध पॅकिंग ठेका महाडिक कुटुंबियांचे नातलग व गायत्री कोल्डस्टोअरेजचे मालक विजय ढेरे, संजय ढेरे, अर्चना ढेरे यांच्याकडे होता.

  • पुणे-बंगळूर महामार्गाशेजारी ४ ते ४.५ लाख लिटर पॅकिंग प्लॅंटचा गोकुळला फायदा झाला आहे.

  • गोकुळच्या सत्तांतरापूर्वी गोकुळ ते मुंबई दूध वाहतुकीचा ३५ टक्के कोटा महाडिक कुटुंबियांच्या व्यंकटेश्‍वरा बल्क कॅरिअर्सकडे होता

  • बोरिवली व विरार येथील कोल्हापूर आईस ॲण्ड कोल्डस्टोअरेज यांच्या नावाने असणाऱ्या दूध एजन्सीचे मालक राजन शिंदे व स्वरूप महाडिक हे असून, २३ वर्षांपासून हा ठेका त्यांच्याकडे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT