gokul election candidate arun narke reverse elections from kolhapur political latest update 
कोल्हापूर

"गोकुळ'च्या इतिहासात सलग दहा वर्षे अध्यक्ष पद भुषवणाऱ्या 'या' उमेदवारांनी घेतला अर्ज  मागे

निवास चौगले

कोल्हापूर :"गोकुळ'च्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज छाननीची प्रक्रिया काल (ता. 6) पूर्ण झाली. कालपासूनच उमेदवारी अर्जांची माघार सुरू झाली. आज पहिल्याच दिवशी  नरके यांच्यासह दोघांनी अर्ज मागे घेतला. 20 एप्रिल हा अर्ज माघारीचा अखेरचा दिवस असून, त्याच दिवशी संघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सलग नऊ निवडणुका लढवून त्या जिंकलेले, 46 वर्षे सलग संचालक असलेले ज्येष्ठ संचालक अरुण नरके यंदा पहिल्यांदाच संघाच्या निवडणूक रिंगणातून बाहेर पडले. त्यांच्यासह त्यांच्या स्नुषा स्निग्धा चेतन नरके यांनीही आज माघार घेतली. 

"गोकुळ'ची स्थापना झाल्यावर संस्थापक (कै.) आनंदराव पाटील-चुयेकर यांच्यासह  नरके 1977 पर्यंत शासन नियुक्त संचालक मंडळावर कार्यरत होते. त्यानंतर झालेल्या तब्बल नऊ निवडणुका त्यांनी लढविल्या आणि जिंकल्याही. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीनंतरच्या पहिल्याच वार्षिक सर्वसाधारण सभेत यापुढे संघात नसणार, असे त्यांनी जाहीर केले होते. उत्तराधिकारी म्हणून पुत्र चेतन यांना यापुढे संधी देण्याची घोषणा त्यांनी केली होती. 46 वर्षांच्या संचालकपदाच्या काळात ते सलग 27 वर्षे राष्ट्रीय पातळीवरील इंडियन डेअरी बोर्डाचे संचालक, तर सलग तीन वर्षे अध्यक्ष होते. याशिवाय, त्यांच्या कारकीर्दीतच "गोकुळ'ला खऱ्या अर्थाने वैभव प्राप्त झाले. दुग्ध क्षेत्रातील वर्गिस कुरियन पुरस्कार मिळवणारे  नरके हे महाराष्ट्रातील एकमेव संचालक आहेत. त्यांच्या काळात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार "गोकुळ'ला मिळाले. 

सलग दहा वर्षे अध्यक्ष 
"गोकुळ'च्या इतिहासात सर्वाधिक आणि सलग दहा वर्षे अध्यक्ष राहण्याचा बहुमान नरके यांच्या नावावर आहे. 3 डिसेंबर 1990 ते 13 डिसेंबर 2000 या काळात ते अध्यक्ष होते, याच काळात संघाला राज्य आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचविण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला. 

मंत्र्यांच्या उड्या पडतात याचे समाधान 
सलग 46 वर्षे "गोकुळ' सारख्या संस्थेत काम करणे आव्हान आहे, या काळात उत्पादक, संचालक, कर्मचारी, अधिकारी बघितले. या काळातील कामावर मी समाधानी आहे. या संघामुळेच मला महानंदा, इंडियन डेअरी असोशिएशन यासारख्या प्रतिष्ठीत संस्थांवर काम करण्याची संधी मिळाली. आज "गोकुळ' कडे बघितल्यानंतर तो किती मोठा झाला याचा अभिमान आहे. याच संस्थेसाठी मंत्री, आमदारांच्या उड्या पडतात हे बघून समाधान वाटते. 
अरूण नरके, संचालक, गोकुळ. 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT